जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर फाडला, मुंब्र्यात तणाव वाढला

Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर फाडला, मुंब्र्यात तणाव वाढला

Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर फाडला, मुंब्र्यात तणाव वाढला

मुंब्र्यात राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर (Banner) फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 14 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. राज्यभरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र मुंब्र्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला डिवचण्याचा प्रकार समोर आल्यानं गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मुंब्र्यात राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर (Banner) फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे नुपूर शर्मा वादामुळे समस्त मुस्लिम समाज हिंसक आंदोलन करत असतानाच मुंब्र्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला डिवचण्याचा प्रकार समोर आल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. 14 जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आपल्या नेत्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुंब्रा येथे देखील इरफान सय्यद या मनसैनिकाने आपल्या नेत्याचे अभिष्टचिंतन करणारे बॅनर लावले. मात्र नुराणी हॉटेल समोर भररस्त्यात लावलेल्या बॅनर ला अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना घडल्यानं तणाव निर्माण झाला. तुम्हालाही सारखा थकवा जाणवतो? हे पदार्थ शाकाहारींना एनर्जी वाढवण्यास करतील मदत याआधी देखील मुंब्रा कौसा भागात असणाऱ्या मनसे कार्यालयावर अज्ञात व्यक्तींद्वारे दगडफेक करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता परत तसाच प्रकार झाल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी मुंब्रा पोलिसात धाव घेऊन हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली. हिंमत असेल तर पाठून कारस्थान न करता समोरून विरोध करा असा इशारा इरफान सय्यद यांनी दिला. आज भेठीगाठी नाही, कार्यकर्त्यांना केलं आवाहन तब्येत ठिक नसल्यानं राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. “माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही,” असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येत असतात. Vat Savitri Vrat: वट सावित्री दिवशी महिलांनी या 5 गोष्टींची काळजी घ्या; या चुका होऊ देऊ नका सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आहे. तसंच त्यांची हिप बोनची शस्त्रक्रिया ही होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्यानं ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंचं मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन “वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या” 14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या.", असं राज ठाकरेंनी आपल्या ऑडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात