मुंबई, 27 मे : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत पाळले जाते. यावर्षी मंगळवार, 14 जून रोजी वट सावित्री व्रत आहे. वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. वट सावित्री व्रताच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, याविषयी पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून माहिती जाणून (Vat Savitri Vrat) घेतली आहे.
वट सावित्री व्रतादरम्यान काय करावे -
1. वट सावित्रीच्या उपासनेसाठी साहित्याची व्यवस्था अगोदरच केली तर चांगले होईल. उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.
2. उपवासासाठी सुहासिनी महिलांनी स्वतःचा मेकअप किंवा सुहाग साहित्य खरेदी करावे. कारण हा उपवास फक्त अखंड सुहागासाठी ठेवला जातो. उपवासाच्या दिवशी त्यांचाच वापर करा.
3. वट सावित्री व्रतामध्ये ते भिजवलेले हरभरे खाऊन पारण केले जाते. पारणाच्या वेळी 11 भिजवलेले हरभरे न चघळता खावेत.
4. या दिवशी वटवृक्षाची पूजा करावयाची असून त्याला कच्चे सूत 7 वेळा गुंडाळायचे आहे. वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान 7 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा करतात.
हे वाचा -
आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे
5. पूजेच्या वेळी वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा ऐकून व्रताचे महत्त्व कळते.
6. यावेळी महिलांनी कपड्यांमध्ये आणि मेकअपच्या वस्तूंमध्ये लाल रंग वापरा. लाल रंग हे सुहासिनीचे प्रतीक मानले जाते.
वट सावित्री व्रतादरम्यान काय करू नये -
1. या दिवशी काळ्या, पांढऱ्या किंवा निळ्या बांगड्या घालू नयेत. तसं करणं नकारात्मकतेचे प्रतीक समजले जाते.
2. काळी, पांढरी किंवा अगदी निळी साडी घालू नका. या दिवशी या रंगीत वस्तूंचा वापर टाळला तर चांगलं होईल.
हे वाचा -
जूनमध्ये या 5 ग्रहांच्या स्थितीत होणार मोठे बदल; या राशीचे लोक होणार मालामाल
3. तुम्ही हे व्रत सुहागासाठी ठेवत असाल तर या दिवशी संयमाने वागावे. जोडीदाराशी वाद टाळा.
4. या दिवशी खोटे बोलू नये. मनात कोणाबद्दलही द्वेष, वैर वगैरे ठेवू नका.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.