किनोआ : किनोआचे (Quinoa) कमी केले तरीदेखील त्यातून जास्त ऊर्जा मिळते. जास्त ऊर्जा मिळाल्याने आपल्याला कमी थकवा येतो आणि किनोआचे सेवन कमी आपले वजनदेखील वाढत नाही.
नट्स आणि बिया : शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सदेखील (Nuts And Seeds) खूप युयुक्त ठरतात. यामध्ये काजू, बदाम आणि भोपळ्याच्या बिया आपल्याला थकवा कमी करण्यास मदत करतात.
ताज्या भाज्या, शेंगा : शरीराला हवी असणारी सर्व पोषक तत्व आणिऊर्जा भाज्यांमधून (Fresh Vegetables) मिळते. त्यामुळे शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ताज्या हिरव्या भाज्या आणि विविध शेंगा खाव्यात.
ताजी फळे : सर्व फळांमध्ये (Fresh Fruits) आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व असतात. मात्र केली आणि लिंबूवर्गीय फळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे लवकर थकवा येत नाही.
रताळे : रताळे (Sweet Potato) हेदेखील ऊर्जेसाठी एक उत्तम स्रोत असल्याचे मानले जाते. रताळ्यांच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.
ब्राऊन राईस : ब्राऊन राईस (Brown Rice) म्हणजेच हलक्या तपकिरी तरंगांचे बतांदूळ आपली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याचे सेवन केल्यास आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये (Green Tea) कॅफिन आणि कॅटेचिन असतात. हे ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामुळे थकवा कमी होऊ शकतो. ग्रीन टीमुळे शरीरात ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होते.
पाणी : पाण्याद्वारेही (Water) शरीराला पुरेशी ऊर्जा मिळू शकते. शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पाणी गरजेचे असते. यासोबतच पाण्याद्वारे सर्व पोषक तत्व संपूर्ण शरीरात पसरतात.
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये (Dark Chocolate) प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, पोटॅशियम यांसह अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे हे ऊर्जेचा एक चांगला स्रोत बनते. यामुळे मानसिक थकवा कमी येतो.
दही : दही (Curd) शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवत नाही.