मुंबई, 11 जून : मनसेच्या साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. मुंबईतला पाऊस आणि दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेता राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिला. प्रशासनाच्या साधन सुविधेवरूनही राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं आहे. याचवेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातील उद्विग्नता बोलून दाखवली. ‘सगळ्या प्रसंगांमध्ये आपण सगळीकडे धावून जातो. सगळ्या ठिकाणी आपले लोक प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो मतदानाच्या वेळी कुठे जातात? नाशिकमध्ये अनेक शेतकरी मला भेटायला आले. अनेक प्रश्न मला सांगत होते. म्हणलं तुमच्या इकडचा आमदार कोण? या पक्षाचा. खासदार कोण या पक्षाचा. जिल्हा परिषद कुणाच्या हातात? या पक्षाच्या हातात. जे तुमची पिळवणूक करतात, त्यांच्याच हातातच सगळ्या गोष्टी देणार असाल, तर माझ्याकडे येता कशाला? एका पोराने मला हंटर दिला, नाही मतदान केलं ना,’ असं राज ठाकरे म्हणाले. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष, फडणवीस हसले अन् म्हणाले… ‘जगभरामध्ये जेव्हा आपत्कालिन घटना घडतात, खासकरून परदेशामध्ये त्यांच्याकडे काय व्यवस्थापन असतं. स्टेडियममध्ये पाऊस पडला तर समोरचं पिच आणि पूर्ण ग्राऊंड सुकवण्यासाठी यंत्रणा होत्याच, पण हेलिकॉप्टर आणलं आणि त्याच्या वाऱ्याने ते सुकवलं. आमच्याकडे अहमदाबादला उद्या मॅच आहे, आम्ही आज हेयर ड्रायरने सुकवतोय. हे आपल्याकडचं आपत्कालिन,’ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. ‘राज्यातल्या बाहेरचे लोक येणार, नाल्यांवर चहूबाजूंनी झोपड्या उभ्या करणार. मला वाटायचं मुंबईमध्ये तीन नद्या आहेत, आता फक्त मिठी नदी उरली आहे. तिला पण सगळ्यांनी ज्या मिठ्या मारल्यात त्यातून ती बाहेरच येत नाही. मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, त्यातल्या चारही नद्या आपल्या लोकांनी मारून टाकल्या,’ असं राज ठाकरे म्हणाले. ’…तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार’, फडणवीस स्पष्टच बोलले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.