मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचवला 'हा' उपाय

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचवला 'हा' उपाय

आजारी रुग्ण आणि त्याच्या नातेनातेवाईकांची मन:स्थिती बिकट असते.

आजारी रुग्ण आणि त्याच्या नातेनातेवाईकांची मन:स्थिती बिकट असते.

आजारी रुग्ण आणि त्याच्या नातेनातेवाईकांची मन:स्थिती बिकट असते.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 3 मे: राज्यात कोरोना विषाणूचा (covid 19) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोनावर उपाय सुचवला आहे.  याशिवाय अमित ठाकरें यांनी डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सची मदत केली आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांना PPE किट्स, मास्क आणि बेडशिट्स वाटप केले होते. राज्यात कोरोना विषाणू (covid 19) व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरीकांना माहीत नाही, त्यामुळे काही नागरीकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. तरी रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पत्र लिहून एक उपाय राज्य सरकारला सुचविला आहे. हेही वाचा.. अंत्यविधीपूर्वी समोर आलं धक्कादायक सत्य, नातेवाईकांना दिला दूसराच मृतदेह अमित ठाकरे यांनी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येत असणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी एक खास अॅप तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणी केली आहे. अॅपद्वारे लोकांना रुग्णालयात जागा उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळावी. रुग्णसंख्या किती झाली याची माहिती मिळावी, असंही अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मनसेचं नेतेपद स्विकारल्यानंतर अमित राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. हेही वाचा...महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत तक्रार, तहसिलदारालाच मारहाण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. मात्र, आजाराच प्रादुर्भाव सर्व सामान्य व्यक्तींना झाला त्यांनी काय करावं, यावर काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारने यासाठी हेल्पलाईन सुरु केली आहे. पण अनेकांना हा आजार झाल्यानंतर नेमकं काय करावं, कोठे जावं हे कळत नाही. यासंदर्भात मनसेकडे असंख्य तक्रारी येत असल्याचं अमित ठाकरे यांना म्हटलं आहे. आजारी रुग्ण आणि त्याच्या नातेनातेवाईकांची मन:स्थिती बिकट असते. त्यांना या स्थितीत काय करावं हे, सूचत नाही. सध्याच्या युगात सगळ्याकडे अँड्राईड फोन आहे. राज्यात कोरोना विषाणू (covid 19) व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरीकांना माहीत नाही, त्यामुळे काही नागरीकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. याच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना खूप त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी एक खास अॅप तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणी केली आहे. अॅपद्वारे लोकांना रुग्णालयात जागा उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळावी. रुग्णसंख्या किती झाली याची माहिती मिळावी, असंही अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Udhav thackeray

पुढील बातम्या