मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंत्यसंस्कारापूर्वी समोर आलं धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला दूसराच मृतदेह

अंत्यसंस्कारापूर्वी समोर आलं धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला दूसराच मृतदेह

धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दीपक बोरसे,(प्रतिनिधी) धुळे, 3 मे: धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. मृताच्या नातेवाईकांना दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह देण्यात आली. अंत्यसंस्काराच्या काही क्षणाआधी हा प्रकार लक्षात आल्याने संबंधित नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला. याबाबत मिळालेली अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी रवींद्र दिलीप ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता. तब्बल 48 तास सदर मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ताब्यात ठेवला होता. हेही वाचा.. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत तक्रार, तहसिलदारालाच मारहाण मृत रवींद्र ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तब्बल 48 तासानंतर नातेवाईकाना मृतदेह ताब्यात देण्यात आला. नातेवाईक मृतदेह घरी घेऊन गेले. अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. मात्र, अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच मृतदेह रवींद्र ठाकरे यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आलं. दुसराच मृतदेह आल्याने जापी गावकऱ्यांची तारांबळ उडाली. संबंधित नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सर्व प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आणून दिला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालय प्रशासनाने रवींद्र ठाकरे यांचा मृतदेह सोनगीर येथील अन्य मयताच्या नातेवाईकांना दिला. त्यांना रवींद ठाकरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या धार्मिक परंपराप्रमाणे अंत्यसंस्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेही वाचा.. प्रसवकळांसह 100 किमी अंतरावर भटकत होती ती, प्रसूतिनंतर धक्कादायक माहिती आली समोर धुळे आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि समाजातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातो.  प्रशासनाकडून मृतदेहाची हेळसांड करण्यात आली, असा आरोप रवींद्र ठाकरे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या