मुंबई 23 ऑगस्ट : मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात मनसेचा मेळावा सुरू आहे. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंची ही पहिलीच सभा आहे. यात राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपसह अनेक राजकीय पक्षांवर आणि नेत्यांवर टीका केली आहे. नुपूर शर्मा प्रकरणावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना काढून टाकलं. सगळ्यांनी माफी मागितली. मात्र, मी नुपूर शर्मांचं समर्थन केलं. त्यांची बाजू घेतली. राज ठाकरे म्हणाले, की नुपूर शर्मा स्वतःच्या मनातलं बोलत नव्हत्या. त्या चुकीचं काहीच बोलल्या नव्हत्या. झाकीर नाईक यांच्या मुलाखतीत त्यांनीही तेच सांगितलं जे नुपूर शर्मा बोलत होत्या. पण नाईक यांना कोणीच काही बोललं नाही. माफी मागायला सांगितलं नाही. ते ह***र दोन भाऊ ओवेसी आमच्या देवी देवतांबद्दल बोलताक. शेवट काय बोलले ते की - ‘भगवान के कैसे कैसे मनहुस नाम रखते है’. आमच्या देवी देवतांना असलं बोललं तरी कोणी माफी मागायला सांगणार नाही. या देशात चांगले मुस्लीमही आहेत, पण हे चांगले नाहीत. मात्र, सरकार यांच्या जीभेवर कोणत्याही प्रकराची बंधने आणयाला तयार नाही, अशी खंतही ठाकरेंनी बोलून दाखवली. Raj Thackery : ‘मी गद्दारी करून बाहेर पडलो नाही’, राज ठाकरे गरजले राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि राजकीय नेत्यांवरही सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले, की राजकीय नेते तिकिट नाही मिळालं की पक्ष बदलात. मात्र, यांनी पक्ष बदलल्यावरही जनता यांना मदतान करते, हे विशेष वाटतं. भाजप आणि शिवसेनेत अडीच वर्षाच्या मुख्यमत्रिपदावरुन झालेल्या मतभेदावरही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. भाजप शिवसेना युतीच्या वेळी मुख्यमंत्रिपदासाठी झालेल्या चर्चेसाठी मी पण होतो. तेव्हा बाळासाहेबांच्या समोर असं ठरलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्याचे मुख्यमंत्री. हे खूप आधीच ठरलं होतं, तर शिवसेनेचे कमी आमदार येऊनही तुम्ही मुख्यमंत्रिपद मागितलंच कसं? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. राज ठाकरे म्हणाले, की ज्याचे जास्त आमदार त्याचे मुख्यमंत्री असं ठरलेलं होतं. दुसरं म्हणजे, पंतप्रधान मोदी भाषण करताना त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसले होते. त्यावेळी मोदींनी जाहीर भाषणात सांगितलं की सत्ता परत येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मग त्यावेळी तुम्ही काहीच का बोलला नाही. जर तुमचा याला विरोध होता, तर त्याचवेळी तुम्ही यावर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.