सांगली, 14 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. मात्र वाढदिवशीच वेगळी बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयानं (Shirala court issues) अटक वॉरंट काढलं. त्यानंतर इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावा आणि त्यांना जामीन मंजूर करावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दाखल केलेल्या या अर्जावर सुनावणी पूर्ण झालीय. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या शुक्रवारी फैसला होणार आहे. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर अर्जावरील निर्णय न्यायालयानं शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. राज ठाकरे यांच्या बाजूने अॅड. विजय खरात, अॅड. धीश कदम, अॅड. आनंद चव्हाण यांनी युक्तीवाद केला. ‘‘राष्ट्रपतीपदासाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी’ युक्तीवादात ते म्हणाले की, राज ठाकरे यांचा या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळे या खटल्यातून त्यांचं नाव वगळण्यात यावं. त्यातच राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या पायावरही शस्त्रक्रिया होणार आहे. यामुळे ते सुनावणीसाठी हजर राहू शकत नाहीत. पुढे म्हटलं की, जनहितासाठी झालेल्या आंदोलनाचे खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारनंही घेतला आहे. त्यामुळे हे अटक वॉरंट रद्द करुन त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या बाजूनं अॅड. रणजीत पाटील यांनी युक्तीवाद केला. हे प्रकरण खूप जुनं आहे. त्यामुळे निकाली निघणं गरजेचं असल्याचं पाटील यांनी म्हटलं. राज ठाकरे सुनावणीसाठी हजर राहत नाही आहेत. त्यामुळे ते लांबत चाललं आहे. राज ठाकरे हजर राहिल्याशिवाय हे कामकाज पुढे चालणार नाही. त्यांना काढलेले वॉरंट योग्यच असल्याचं रणजीत पाटील यांनी म्हटलं. 28 एप्रिलला राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट शिराळा न्यायालयात हा खटला सुरु आहे. 28 एप्रिलला राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं गेलं. या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट काढलं. न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासह सांगली मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह 10 जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच 28 जानेवारी, 25 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2022 या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिरीष पारकर हे न्यायालयात हजर राहिले. तेव्हा त्यांनी जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्यानंतर 2008 साली भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी यामागणीसाठी मनसेकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. याप्रकरणी रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे अटक केली होती आणि त्यानंतर कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. त्यामुळे राज्यभर मनसेतर्फे आंदोलन केलं होतं. तसंच अनेक ठिकाणी बंदही पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. कारण तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारला होता.या बंदात व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले होते. Siddharth Chandekar Bday: मिश्किल आणि गोड स्वभावाच्या सिद्धार्थचं बालपण होतं खडतर दरम्यान सद्यस्थितीत, राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने देण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.