मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Siddharth Chandekar Bday Special: मिश्किल आणि गोड स्वभावाच्या सिद्धार्थचं बालपण होतं खडतर

Siddharth Chandekar Bday Special: मिश्किल आणि गोड स्वभावाच्या सिद्धार्थचं बालपण होतं खडतर

मराठीतील एक मिश्किल आणि गुणी अभिनेता सिद्धार्थ सीमा चांदेकर (Siddharth Chandekar) आज त्याचा ग्रँड वाढदिवस लंडनमध्ये त्याच्या बायकोसोबत साजरा करत आहे. आज यशाच्या शिखरावर असणाऱ्या या यशस्वी अभिनेत्याने एकेकाळी खडतर बालपण अनुभवलं आहे हे माहित आहे का तुम्हाला?

पुढे वाचा ...
  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 13 जून: मराठीतील एक अग्रगण्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)  वयाच्या एकतिसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. सिद्धार्थ कायमच एक गुणी अभिनेता आणि खोडकर व्यक्ती राहिला आहे. आपल्या कूल अंदाजाने त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत सोबतच मोठा मित्रपरिवार सुद्धा कमावला आहे. एवढ्या सुखवस्तू परिस्थितीत आज असणाऱ्या सिद्धार्तने एक खडतर बालपण (Siddharth Chandekar childhood) पाहिलं आहे याची कल्पना आहे का तुम्हाला?

सिद्धार्थने त्याच्या रिलेशनशिपबदल, मित्रांबद्दल अनेक मुलाखतींमध्ये बराच उल्लेख केला आहे पण त्याच्या बालपणाविषयी तो फारसा बोलताना दिसत नाही. सिद्धार्थने आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी ‘दिल के करीब’  या मुलाखतीच्या कार्यक्रमात शेअर केल्या आहेत. सिद्धार्थ सीमा चांदेकर चा जन्म पुण्यात झाला असून त्याच सगळं शिक्षण पुण्यातच झालं आहे. सिद्धार्थने त्याच्या आयुष्यात बराच कठीण काळ बालपणी पाहिला आहे. याबद्दल तो सांगतो, “मी एवढा सकारत्मक आणि उत्साही असण्याचं कारण माझं बालपणात लपलं आहे. माझं बालपण टिक्ट्स उत्साही नव्हतं. माझ्या आईबाबांच्या वेगळं होण्यापासून अनेक कौटुंबिक गोष्टी होताना मी पाहिल्या आहेत. आमची परिस्थिती सुद्धा त्या काळी फारशी बरी नव्हती. पण माझ्या आईचं आणि बहिणीचं यात खूप मोठं श्रेय आहे. त्यांनी अनेक गोष्टी माझ्यापर्यंत न पोहोचवू देता माझ्यात एवढा उत्साह आणि साकारत्मकता भरली आहे की तीच मला आयुष्यभर पुरेल असं वाटतं.”

" isDesktop="true" id="716835" >

सिद्धार्थ त्याच्या आईशी (Siddharth Chandekar Mother) आणि बहिणीशी खूप क्लोज आहे. त्याच्या अत्यंत जवळच्या दोन व्यक्तींबद्दल तो सांगतो, “ माझी आई कायमच माझी प्रेरणा राहिली आहे. तिचं नाव मी माझ्या नावापुढे लावतो. माझ्या आईने मला प्रत्येक बाबतीत सकारत्मक राहण्याची, प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघण्याची गोष्ट शिकवली आहे. आणि माझी बहीण सुद्धा माझ्या तितकीच जवळची आहे. आमच्या अख्ख्या कुटुंबाला माझ्या ताईने सावरलं आहे असं म्हणलं तर चुकीचं नसेल."

हे ही वाचा- घोड्या सारख्या उड्या कशा मारायच्या पाहायचं असेल तर मृण्मयी आणि गौतमीचा हा भन्नाट Video नक्की पाहा!

सिद्धार्थने अगदी सोळाव्या-सतराव्या वर्षी अग्निहोत्र मालिकेत काम केलं ज्यातून तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा बनला. जवळपास एकोणिसाव्या वर्षी त्याने झेंडा चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर या कलाकाराने मागे वळून पाहिलं नाही.

आज सिद्धार्थ विवाहित आहे. त्याच्या मनासारख्या जोडीदारासोबत तो आयुष्य घालवत आहे. कामाच्या बाबतीत सुद्धा त्याला उत्तम यश मिळत आहे. त्याच्या ‘झिम्मा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. त्याच्या आयुष्यात त्याची भरभराट व्हावी असं सगळ्या प्रेक्षकांचं आणि त्याच्या चाहत्यांचा सुद्धा मत आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Siddharth chandekar