मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी

''राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी BJP ने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'', संजय राऊतांनी केली मागणी

शरद पवार (NCP supremo Sharad Pawar)  यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

  • Published by:  Pooja Vichare

अयोध्या, 14 जून: भाजपनंच (BJP) शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी केली आहे. सध्या देशात भाजपविरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असतानाच संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं.

दरम्यान काल काँग्रेसनंही शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शवला. मात्र याबाबत शरद पवारांना विचारलं असता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे आणि 21 जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे ठरतोय मृत्यूचा सापळा; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते.

शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिलं जातं, असं ही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाळ संपणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलैला संपत आहे. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाकडून सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. या निवडणुकीत केवळ विधानसभा आणि लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरवतं. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

First published:

Tags: Sanjay Raut (Politician), Sharad Pawar (Politician)