जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Update: परतीच्या पावसाचा जोर कायम; पुढील 4 दिवस राज्यात अशी असेल स्थिती

Weather Update: परतीच्या पावसाचा जोर कायम; पुढील 4 दिवस राज्यात अशी असेल स्थिती

फाईल फोटो

फाईल फोटो

शुक्रवारी परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 15 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा 3-4 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु झाला आहे. परतीच्या पावसाचा परिणामही राज्यभरात वेगवेगळ्या भागात दिसून येत आहे. आता शुक्रवारी परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यातून पावसाची एक्झिट कधी? आता दिवाळी पण पाण्यात जाणार का? हवामान खात्याने सांगितली तारीख हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. 16 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे. मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. भिवंडीत मोठी दुर्घटना, चार जणांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू मागच्या काही दिवसांत भारतातील काही भागात परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिमेत होत असलेल्या वादळामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला होता परंतु मागच्या 3-4 दिवसांत त्याची तीव्रता कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे पुणे वेदशाळेतील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दक्षिण भारतातील काही प्रदेश वगळता उर्वरित देशात या महिन्याच्या सुरुवातीपासून अतिरिक्त पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश (696%), उत्तराखंड (539%), हरियाणा (577%), दिल्ली (625%) आणि मध्य प्रदेश (301% टक्के) पाऊस झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात