भोपाल/ग्रेटर नोएडा, 5 फेब्रुवारी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा चुलत भाऊ आणि वहिणीची ग्रेटर नोएडामध्ये हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांचे 70 वर्षीय भाऊ नगेंद्र नाथ आणि 65 वर्षीय वहिनी सुमान नाथ आपल्या ग्रेटर नोएडातील Alfa-2 सेक्टरमधील I-24 घरात शुक्रवारी मृत अवस्थेत आढळून आले. (Murder of former CMs cousin and sister in law) याची सूचना मिळताच गौतमबुद्ध नगर पोलीस कमिश्नर आणि संबंधित अधिकारी, फॉरेन्सिकची टीम, डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुहेरी हत्याकांडात कोणा जवळील व्यक्तीचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार घरात कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केल्याचे दिसत नाही. आरोपींनी दाम्पत्याची गळा दाबून हत्या केली. सुमन भारती योग संस्थानात योगा ट्रेनर होत्या. त्या गेल्या बऱ्याच वेळापासून लोकांना मोफत योग सेवा देत होत्या.
हे ही वाचा-मोठी बातमी : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून दिलासा
मुलाने पोलिसांना सांगितलं..
सुमन नाथ आणि नरेंद्र नाथ यांचा मुलगा रोहित आपली पत्नी निधीसोबत दुसऱ्या ठिकाणी राहतो. मृत दाम्पत्याची मुलगी दिल्लीत राहते. पोलिसांना रोहितने सांगितलं की, घरात कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. त्याशिवाय गुरुवारी रात्री 11 वाजता आईची सोनूसोबत फोनवर बोलणं झालं होतं. सुमन यांनी सांगितलं की, खाली पार्टी सुरू आहे. त्यावेळी सोनूने सांगितलं की, दार बंद करुन झोपं. (Murder of former CM kamalnath cousin and sister in law)
घरात सापडली दारुची बाटली आणि खाण्याच्या वस्तू
पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीच्या घरी रात्री उशिरा पार्टी सुरू होती. घटनास्थळावरुन दारुची बाटली आणि खाण्याचं सामान एकत्र केलं आहे. पोलिसांना घरात सर्व सामान अस्ताव्यस्त असल्याचं दिसतं. बेसमेंटचा तपास केला असता असं दिसतं की, मृतक आणि आरोपी एकत्र बसून दारू पीत होते.
सुमन यांनी जावयाला सांगितलं की, घराच्या खाली पार्टी सुरू आहे
सुमन नाथ या रात्री जावयासोबत बोलल्या होत्या. त्यांनी जावयाला सांगितलं होतं की, खाली पार्टी सुरू आहे. यादरम्यान पोलिसांना क्लूदेखील मिळाला की, दाम्पत्याने काही लोकांना पैसे दिले होते. यासाठी आता तपास या दिशेने वळविण्यात आला आहे. कोणी पैशावरुन त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे. डीसीपी ग्रेटर नोएडा राजेश सिंह यांनी सांगितलं की, प्रत्येक दिशेने तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Kamal nath, Murder