मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Radhakrishna Vikhe Patil : वाचाळपणा बंद करा अन्यथा… राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर प्रहार

Radhakrishna Vikhe Patil : वाचाळपणा बंद करा अन्यथा… राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर प्रहार

वाचाळपणा कराल तर एकटे पडाल अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

वाचाळपणा कराल तर एकटे पडाल अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

वाचाळपणा कराल तर एकटे पडाल अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अहमदनगर, 27 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या बुलडाण्याच्या सभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

जनाची नाही, मनाची तरी ठेवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलढाणा येथील सभेत केली होती. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलताना भान ठेवायला हवे. ते एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. सत्ता गेल्याचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

हे ही वाचा : कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस..., एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर

अडीच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पुर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विज कनेक्शन तोडू नये अशा सुचना अगोदरच दिल्या आहेत. आपण मात्र बांधावर जावून विज कापण्याचं काम केलं. पातळी सोडून जर वाचाळपाणा करत राहीला तर भविष्यात ते एकटेच राहतील असा टोला विखे पाटलांनी लागवला.

गेल्या अडीच वर्षात सरकार नावाची व्यवस्थाच राज्यात शिल्लक नव्हती. कोविडमध्येही लोक वा-यावर होते नंतरही कुठली मदत नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसता तर राज्याची अवस्था काय झाली असती? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी वास्तवाचं भान ठेवायला हवं असा सल्ला विखे पाटलांनी शेतकरी आत्महत्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे आणी पुढची वीस वर्ष शिंदे फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहणार असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय.

हे ही वाचा : गुवाहाटीत 'व्यवस्था' केल्यामुळे शिंदे सरकार खूश, आसाम सरकारला देणार नवी मुंबईत जागा!

वाळू माफियांकडून जीविताला धोका असल्याने बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केलीये. याची गंभीर दखल घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

तर वेळप्रसंगी मोक्का लावणार

राज्यातील वाळू तस्कर आणि खानमाफीयांवर लगाम लावलाय म्हणून काही आमदारांचाही थयथयाट झालाय. वाममार्गाने पैसा मिळवून त्याचा उपयोग जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी होतोय. बीडच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असून वेळप्रसंगी मोक्का लावला तरी हरकत नाही अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Radha krishna vikhe patil, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)