मुंबई, 10 जुलै : अनेकांच्या आयुष्यात लग्नाआधी (Marriage) काही ना काही कारनामे झालेले असतात. त्यामुळे लग्नानंतर अनेक जण त्याची पुनरावृत्ती होऊ नये, किंवा त्याचा लग्नानंतरच्या आयुष्यावर (Life After Marriage) परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घेतात. मात्र, पुण्यातील एकाला लग्नाआधी घडलेला प्रकार लपवणे चांगलेच महागात पडले आहे. (Pune Man Hide Marriage History) इतकेच नव्हे तर त्याला तुरुंगातही (Jail) जावे लागले. काय आहे नेमकं प्रकरण - पुण्यातील एका तरुणाने बायकोपासून ट्रॅव्हल हिंस्ट्री लपविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचे नाव समदर्शी यादव असे आहे. तर झाले असे की, त्याच्या पासपोर्टमधील पाने गहाळ झाल्यामुळे त्याला गुरुवारी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी त्याला अडवले होते. यावेळी त्याने स्पष्टीकरण दिले की, मीच ही पाने फाडलीत. यानंतर त्याला मालदीवच्या फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले आणि यानंतर त्याला सहार पोलिसांनी अटक केली. पासपोर्टची पाने का फाडलीत - यावेळी त्याने सांगितलं की, 2019 मध्ये लग्न करण्यापूर्वी त्याने त्याच्या बायकोपासून ट्रॅव्हल हिस्ट्री लपविण्याचा प्रयत्न केला आणि पासपोर्टमधील किमान 10 पाने फाडली होती. समदर्शीने पासपोर्टमधील पान नंबर 3 ते 6 आणि 31 ते 34 ही पाने नष्ट केली. त्यामध्ये तो थायलंडला गेल्याची नोंद होती. हेही वाचा - पुण्यातील शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, विद्यार्थिनींच्या छाती, मांडीला केला स्पर्श अन्… दरम्यान, त्याला शुक्रवारी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले गेले. यावेळी त्याची 25 हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 468 आणि 471 नुसार खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वापरणे आणि पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.