चंद्रपूर, 8 जुलै : एकतर्फी प्रेमातून हत्येच्या (Murder) किंवा आत्महत्येच्या (Suicide) घटना समोर येत असतात. आता एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime in One Side Love) ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. राकेश रामाजी चहांदे (35, रा. नवरगाव, ता. सिंदेवाही), असे आरोपी तरुणाचे नाव आहे. काय आहे नेमकं प्रकरण - राकेश रामाजी चहांदे नावाच्या एका तरुणाने एका तरुणीसोबत मोबाईल नंबरच्या आधारे ओळख केली. मात्र, या ओळखीच्या आधारावर त्याने एकर्फी प्रेम व्यक्त करत तो तरुणीच्या घरात शिरला आणि तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर त्याने लग्नासाठी आग्रह धरत मारहाणही केली. ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील सिद्धार्थनगर येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. आरोपी राकेश रामाजी चहांदे हा चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील रहिवासी आहे. तर पीडित तरुणीही ही चिमूर तालुक्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही भिवापूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत आहे. तसेच ती तिथे स्थानिक सिद्धार्थनगर परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. तरुणीचा एक नातेवाईक हा आरोपीच्या घराशेजारी राहतो. आठ महिन्यांपूर्वी नातेवाइकाने काही कामानिमित्त आरोपीच्या मोबाईलवरून तरुणीला आधार कार्ड पाठविले होते. त्यामुळे आरोपीकडे तरुणीचा मोबाईल क्रमांक होता. यावरून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. हेही वाचा - नागपूरमध्ये मुलगी नको म्हणून पत्नीचा छळ, नंतर न सागताच केलं भयानक कृत्य अशातच आरोपी गुरुवारी सकाळच्या सुमारास भिवापूर येथे आला आणि तरुणीच्या घरात शिरुन त्याने तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर लग्नासाठी आग्रह करीत शिवीगाळही केली. तसेच तिला मारहाणही केली. दरम्यान, तरुणीचा आरडाओरड पाहून घरमालकाने धाव घेत तरुणीची सोडवणूक केली. यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सिद्धार्थनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.