नवी दिल्ली, 25 मे : चोरटे चोरी करण्यासाठी विचित्र क्लृप्त्या लढवतात. कधीकधी त्यांचा प्रयत्न फसतो आणि ते घरमालकाच्या किंवा पोलिसांच्या तावडीत सापडतात. अशा फसलेल्या चोरीच्या प्रयत्नांचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय. या व्हिडिओत चोर पोलिसांच्या किंवा घरमालकाच्या नाही तर कुत्र्यांच्या (Dogs) तावडीत सापडलाय. हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओमध्ये एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण तो अपयशी ठरल्याचं दिसतंय. आजूबाजूला कोणी नसताना चोर घरात घुसल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. व्हिडिओ पाहून असं दिसतं की चोराने चोरी करण्यासाठी छतावरून चढून घरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांमुळे तो आत जाऊ शकला नाही. त्या चोराला 2 कुत्र्यांनी वेढलं होतं. ती कुत्री त्याच्यावर सतत भुंकत होते. ते पाहून चोर स्वत:ला वाचवण्यासाठी दरवाजाला (Door) लटकत राहिला.
दरम्यान, कुत्रे त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. चोर खाली येण्याची वाट पाहत कुत्रे त्याच्यावर जोरजोराने भुंकताना दिसत आहेत. परंतु, नंतर हा व्हिडिओ मध्येच थांबतो. त्यानंतर त्या चोराचं पुढे काय झालं असेल हे माहीत नाही. इन्स्टाग्रामवर gieddee नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये 'पुढे काय झालं?', असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त प्रसिद्ध केलंय.
घरात कोणी नसल्याचं पाहून चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या या चोराची चांगलीच अडचण झाल्याचं या व्हिडिओतून दिसतंय. छतावरून घरात शिरण्याचा त्याचा प्रयत्न कुत्र्यांमुळे अयशस्वी ठरला. महत्त्वाचं म्हणजे खाली दोन कुत्रे होती आणि वर त्याला परत जाता येत नव्हतं. त्यामुळे दारावर लटकून राहण्याची वेळ त्याच्यावर आली. हा व्हिडिओ पाहिल्यावर खरंच हसू आवरता येत नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. या चोराचं पुढे काय झालं?, हे जाणून घेण्यास नेटकरी फार उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी या चोराचं काय झालं? अशी विचारणा कमेंट बॉक्समध्ये केली. तर, काहींनी हसण्याचे इमोजी टाकले. तर एका यूजरने लिहिलंय की, 'मला वाटतंय की तो अजूनही तिथे लटकत असेल.' तर दुसऱ्या एका यूजरने 'वेलकम' चित्रपटातील लोकप्रिय डायलॉग 'ये राज भी उसके साथ चला गया' कमेंटमध्ये लिहिला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 5 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.