जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'काय झालं मरणार होतीस ना', रघुनाथ कुचिक आणि पीडितेचे whatsapp चॅट आले समोर

'काय झालं मरणार होतीस ना', रघुनाथ कुचिक आणि पीडितेचे whatsapp चॅट आले समोर

'काय झालं मरणार होतीस ना', रघुनाथ कुचिक आणि पीडितेचे whatsapp चॅट आले समोर

आपल्या मुलीपेक्षाही लहान असू शकेल अशा तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा कुचिकवर दाखल झाला आणि अनेक धक्कादायक माहिती समोर आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

 पुणे, 17 मार्च : शिवसेनेचे (shivsena) कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पीडित तरुणी तब्बल 2 दिवसानंतर गोव्यात सापडली आहे.ती जिवंत असल्याचा दिलासा जरी असला तरी या प्रकरणात येत असलेल्या धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच  रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणीमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. रघुनाथ बबनराव कुचिक शिवसेनेच्या कामगार सेनेचा जबाबदार पदाधिकारी आहे. त्यामुळे सेनेच्या अंतर्गत वर्तुळातील कायम चर्चेत असलेलं नाव आहे.  मात्र,याच रघुनाथ कुचिकवर कृष्णकृत्य केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. वयानं आपल्या मुलीपेक्षाही लहान असू शकेल अशा तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा कुचिकवर दाखल झाला आणि अनेक धक्कादायक माहिती समोर आली. ( नागपूर जळीतकांड प्रकरणाला नवे वळण, निकीतानेच मागवले होते मित्राकडून डिझेल! ) पोलिसात सादर असलेल्या या दोघांमधील संभाषणही आमच्या हाती हे संभाषण लागलं.  पुण्यातील अनेक रुग्णालयात या पीडितेची फरफट सुरू होती. 5 जानेवारी 2022 ला पुण्यातील नामांकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या पीडितेची सोनोग्राफी करण्यात आली. पीडितेला पोटात असलेल्या या गर्भानं मातृत्वाची, हविहवीशी वाटणारी चाहूल दिली होती. मात्र,तिच्या मातृत्वाचा हक्कही हिरावून घेण्यात आला. कागदोपत्री सहमतीसाठी, जबरदस्ती सही घेतल्याचा दावा पीडितेनं केला. त्यानंतर पुण्यातीलच कोळेकर हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, अॅपल हॉस्पिटल आणि मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या पीडितेला चौघे फिरवीत होते. राहुल गोयल, राहुल बोहरा, प्रवीण साळवी, सतीश दादर या चौघातील तिघे हे रघुनाथ कुचिकचे खास मित्र होते ते पीडितेसोबत होते. यातीलच एका राहुल बोहराच्या साक्षीनं रघुनाथ कुचिकनं पीडितेसोबत चक्क स्टॅम्पपेपरवर करारनामा केला.या प्रकरणी काही दिवसांनी रघुनाथ कुचिकला अटकपूर्व जामीन मिळाला आणि पीडितेला धमकवण्याचा प्रकार सुरू झाला.

News18

पीडितेनं फोन घेणं बंद केलं तर चक्क मेसेजवरही कुचिकची भाषा घसरली. पीडितेला व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करण्यास धमकी देण्यात आली. तू मरणार होतीस ना तर काय झालं, मी तुझ्या सुसाईट नोटची वाट पाहत होतो, बघ अजून एकदा प्रयत्न कर, मला सुखाची झोप लागेेल, असा संवाद या चॅटमध्ये करण्यात आला आहे. ‘GOOD LUCK MY SWEET HEART’, खळबळजनक कॉल रेकॉर्ड्स समोर दरम्यान, पीडित मुलीला अज्ञात व्यक्तीने इंजेक्शन देऊन गोव्यात सोडल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले तर दुसरीकडे पोलीस या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत. दरम्यान, रघुनाथ कुचिकांवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर काही फोन रेकॉर्डिंग्स ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागल्या आहेत. यातील संवादावरुन एक पुरुष मुलीला गर्भपात करण्याचा सल्ला देत असल्याचं दिसतंय. या ऑडिओ क्लीप आपलीच असल्याचं रघुनाथ कुचिकांवर आरोप करणाऱ्या तरुणीचं म्हणणं आहे. पण, या रेकॉर्डिंगमधले आवाज नेमके कुणाचे आहेत, याची पुष्टी ‘न्यूज 18 लोकमत’ करत नाही. रघुनाथ कुचिक यांनी दिलं स्पष्टीकरण या संदर्भात रघुनाथ कुचिक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलं, माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याच्या राजकीय कटातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार आहे. कामगार क्षेत्रातील माझे काम आणि माझी अनेक वर्षे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. ( अंतराळावर नेमकं कोणाचं वर्चस्व? रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख्या जगावर संकट? ) माझा न्यायव्यवस्था आणि पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. तपासानंतर सत्य माझ्या बाजूने येईल असा मला विश्वास आहे. आज गुन्हा दाखल झाला असल्याने मी जास्त बोलणार नाही पण माझी कायदेशीर टीम काम करत असून येत्या दोन दिवसात सविस्तर पुरावे आणि कागदपत्रे देईन असंही रघुनाथ कुचिक यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात