पुणे, 17 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं 14 ऑगस्टला पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघाती निधन झालं. मेटेंच्या या निधनावर त्यांची पत्नी, नातेवाईक तसंच कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. या कार्यकर्त्याची स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. 3 ऑगस्टला विनायक मेटे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पुण्याच्या दिशेने येत असताना एक गाडी पाठलाग करत होती, असं हा कार्यकता या क्लिपमध्ये म्हणत आहे, त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रांजणाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणाव पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा मालक कम चालकाचं नाव संदीप विर आहे, त्यालाही ताब्यात घेऊन पोलीस त्याची चौकशी करत आहेत. 3 तारखेला या गाडीच्या चालकासोबत 6 जण होते. 6 जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्यामुळे ते शिरूरला गेले होते, तसंच शिरूरमध्ये त्यांचे नातेवाईक असल्याकारणामुळे ते तिकडे गेले होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. मेटेंच्या भाच्याचे ड्रायव्हरवर आरोप अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. तसंच, चालक एकनाथ कदम (eknath kadam) याच्यावरही संशय व्यक्त केला आहे. ड्रायव्हर वारंवार विधानं बदलत आहे, असा दावाही मेटेंचे भाचे विनायक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा दरम्यान विनायक मेटे यांची पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहर अतोनात पांढरा पडला होता, असं ज्योती मेटे म्हणाल्या. ‘त्यांचा चेहरा खूप पांढरा पडला होता’, मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा मृत्यूवर संशय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.