जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा

विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर, मेटेंच्या भाच्याने पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा

 
'टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही.

'टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही.

‘टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 17 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (, vinayak mete car accident) यांचं अपघाती निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. मेटे यांच्या अपघाताबद्दल आता नवीन बाब समोर आली आहे. अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. तसंच, चालक एकनाथ कदम (eknath kadam) याच्यावरही संशय व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ‘विनायक मेटे हे आपल्यामध्ये नाही. त्या दुखातून आम्ही अजून सावरलो नाही. विनायक मेटे यांचा अपघात झाला आहे की घातपात झाला आहे, हे स्पष्ट झाले नाही. ड्रायव्हर वारंवार विधानं बदलत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. 14 तारखेला साहेबांच्या गाडीला अपघात झाला, मला पहाटे 5.30 वाजता फोन आला होता. साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आहे, आपल्याला निघायचं आहे, आम्ही तसेच लगेच निघालो. साहेबांचे पीए विनोद काकडे यांचा फोन आला होता, बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बोगद्याजवळ जा. मी त्यावेळी विचारलं ड्रायव्हर कोण आहे. साहेबांकडे तीन ड्रायव्हर आहे. मी मुंबईतील ऑफिसला फोन केला, तेव्हा कळलं की एकनाथ कदम नावाचा ड्रायव्हर आहे. मी फोन एकनाथ कदम यांना फोन केला, तर फोन उचलत नव्हता. त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठे आहे, तर तो रडत होता. मी लोकेशन विचारलं तर तो सांगत नव्हता. नंतर त्याने मला तुम्ही कोण आहे, असं विचारलं. गेल्या 12 वर्षांपासून तो काम करतो, मलाही तो ओळखतो. मी दुसऱ्या फोनवरून जरी फोन केला तरी तो आवाज ओळखत होता. पण, तो अचानक मला तुम्ही कोण आहे, असं विचारत आहे. तो सारखा रडत होता. मी त्याला ठिकाण विचारलं, त्यानंतर तिथे उपस्थितीत एक व्यक्ती मदतीला आली होती. त्यांना मी अपघाताबद्दल विचारलं, तर त्यांनी सांगितलं की, ड्रायव्हरला काहीही झालं नाही, अंगरक्षक बेशुद्ध आहे, तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीत आहात का, मी हो म्हटल्यावर त्याने सांगितलं की, साहेब जागेवर गेले आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं. ( गडकरी आऊट, फडणवीस इन! भाजपच्या संसदीय आणि निवडणूक समितीचं काम नेमकं काय? ) पण चालक एकनाथ कदम सांगत होता की, मेटेंच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्याला दुखापत झाली होती. साहेब बरे आहे, मी साहेबांना 20 मिनिटांपर्यंत बोलत होतो. तेही मी चांगला असल्याचं सांगत होते. मी जेव्हा साहेबांना फोन केला तेव्हा ते फोन उचलत नव्हते, असंही चव्हाण यांनी सांगितलं. ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी समिती नेमली आहे. पण चार दिवस झाले अजूनही काही अहवाल आमच्या कुटुंबीयांकडे आला नाही. ना मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आला आहे. आम्ही या दुखामधून सावरलो नाही, हे आमच्यासाठी खूप मोठं दु:ख आहे, त्यामुळे चालकांची संपूर्ण चुकी आहे, असा आरोप भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केला. (Maharashtra Assembly Monsoon Session : आधी फडणवीस आता मुख्यमंत्री शिंदे, अस्लम शेख यांनी घेतली गुपचूप भेट!) ‘टोलनाक्यावरून निघाल्यावरून 20 ते 25 मिनिटांमध्ये अपघात झाला. त्यामुळे 20 ते 25 मिनिट अंतरावर कुणीही झोपू शकत नाही. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मेटे साहेबांचा चेहरा दिसला नाही. समोर बॉडीगार्ड दिसत होता. चालक कदम हा कुणाला तरी फोनवर बोलत होता, फोन खाली ठेवत होता. दोन महिन्यात कदम याला कुणाचे फोन आले आणि कुणी फोन केले, याची माहिती समोर आली पाहिजे, असा आरोपही चव्हाण यांनी केला. विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रेकॉर्ड पाहिला तर कधीच जास्त वेगात चालवण्याची पावती मिळाली नाही. पण त्याच दिवशी जास्त वेगात का गाडी चालवण्यात आली होती, असा सवालही चव्हाण यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात