मुंबई, 25 ऑगस्ट : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची दखल घेऊन उद्याच्या प्रवासाचा प्लान आखावा. मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर किवळे ते सोमाटणे दरम्यान उद्या ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहन चालक व प्रवाशांनी या कालावधी दरम्यान वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनता Traffic मध्ये ‘कैद’; पुणे ते मुंबई प्रवास 8 तासांचा किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग ( राष्ट्रीय महामार्ग 48 ) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे. पुण्यासह या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई –पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.