जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यासह या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

पुण्यासह या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

फाईल फोटो

फाईल फोटो

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर काही भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 19 ऑगस्ट : राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. पावसामुळे पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. त्यातच आता राज्यातील पाऊस परिस्थिती पाहता, हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने काय म्हटले - राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर काही भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आता हवामान खात्याने म्हटले आहे की, पुणे सातारा नाशिक येथील घाट परिसरात मेघ गर्जनेसह ढग तयार झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार तासात या भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबई, ठाणे, अंशत: ढगाळ वातावरण आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

जाहिरात

विदर्भात पूर परिस्थिती - राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना देखील खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा -  Live Updates : बोरिवलीत 4 मजली इमारत कोसळली, 12 ते 15 लोक अडकल्याची भीती तसंच विदर्भातही IMD नं दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हलक्या ते माध्यम सरी कोसळल्याची चिन्हं आहेत. विदर्भातही गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली आणि भामरागड सारखे भाग पाण्याखाली गेले आहेत. या सर्व ठिकाणी NDRF कडून मदत करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात