पुणे, (अमीत राय) 04 ऑक्टोंबर : पुण्यातील मिनी बालाजी मंदीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारायणपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या चार चाकी वाहनाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता कि यामध्ये 5 पैकी दोघे जागीच ठार झाले. दरम्यान ही कार चार पलटी खात हा अपघात झाला आहे. दरम्यान दोन मुले आणि तीन मुली असल्याची माहिती मिळत आहे. जोरदार वाहन चालवत असताना वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून माहिती मिळाली आहे. दरम्यान या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
अपघात झालेल्या वाहनात विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान हे विविध राज्यातून शिक्षणासाठी पुण्यातील एमआयटी काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
#पुणे नारायणपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या चार चाकी वाहणावरील नियंत्रण सुटल्याने गाडीला अपघात pic.twitter.com/gd1JORWpwT
— News18Lokmat (@News18lokmat) October 4, 2022
हे ही वाचा : पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलं; तिघींचाही मृत्यू, डोंबिवलीतील घटनेनं खळबळ
या अपघातात रचित मोहता (वय 18 रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल), गौरव लालवानी (19, रा रायपूर, छत्तिसगढ) यांचा मृत्यू झाला. तर 3 जणांना पुढील उपचारसाठी पुण्यातील ससुन रूग्णायल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
नारायणपूर येथील सासवड - कापूरहोळ रस्त्यावरील दत्तमंदीराशेजारी एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना गाडीने धडक देत चार पलटी खात हा अपघात झाला आहे. यात वाहनाचा चक्काचूर झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प ठाकरे, आगरी, कोळी सीकेपी बांधवांचे कुलदैवत असलेल्या लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर भाविकांनी आज गर्दीचा उचांक गाठला आहे. एकविरा देवीच्या भक्तांनी गडावर तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्ग हा संपूर्णतः ठप्प झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. हे ही वाचा : पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार कार्ला एकविरा गड हा भाविकांनी फुल्ल झाला असल्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहने ही पुढे सरकत नसल्याने या महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर कार्ला गडदेखील भाविकांच्या तुफान गर्दीने फुल झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांना या भाविकांना रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.