मुंबई, 15 सप्टेंबर : मुंबई-पुणे प्रवास पुन्हा महागण्याची शक्यता आहे. कारण या महामार्गावर लागणाऱ्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-पुणे असा रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलसाठी आणखी जास्त पैसे मोजावे लागतील. रस्ते मार्गाने मुंबई-पुणे हा तीन ते चार तासांचा प्रवास आहे. त्यामुळे अनेकजण मुंबई-पुणे नेहमीचं रस्त्याने अप-डाऊन करतात. अनेकजण दर शनिवार-रविवारी मुंबईहून विकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याला जातात. अशा प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांना भविष्यात टोलसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये पुन्हा 18 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होईल. प्रत्येक तीन वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे. याआधी 1 एप्रिल 2020 रोजी अशीच वाढ झाली होती. 2030 पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचं अद्यादेशात ठरलेलं आहे.
(नाना आणि 'मोदी' एकाच मंचावर! पटोलेंच्या कार्यक्रमाला गावगुंडाला निमंत्रण?)
1 एप्रिल 2023 पासून टोलचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. सध्या पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनाना 270 रुपये टोल आकारण्यात येत आहे. आगामी काळात हाच टोल 320 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.