जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट, मनसेला मोठा झटका बसणार?

पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट, मनसेला मोठा झटका बसणार?

पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट, मनसेला मोठा झटका बसणार?

संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 1 जून : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील इतर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील सुरु असलेले अंतर्गत वाद हे याआधी अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरे मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देतील, अशा विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी एक बातमी आता समोर आली आहे. पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि वसंत मोरे यांची भेट झाली आहे. संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. याशिवाय राऊतांनी मोरे यांना तात्या म्हणून हाक मारली. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांप्रती आपुलकी जाणवली. काही दिवसांपूर्वी मनसेची ठाण्यात उत्तरसभा झाली होती. त्यावेळी वसंत मोरे यांनीदेखील भाषण केलं होतं. ते भाषण संजय राऊतांनीदेखील ऐकलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी मोरेंचा निरोप घेत असताना पुन्हा भेटू, असं विधान केलं. त्यामुळे वसंत मोरे यांना राऊतांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ऑफर दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस, देशाच्या राजकारणात खळबळ ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्याबाबत अल्टिमेटम दिला होता. त्यावेळी वसंत मोरेंनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाला उघडपणे विरोध केला होता. त्यांनी मुस्लिम कार्यकर्ते नाराज असल्याचं प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर वसंत मोरे यांना पुणे शहराध्यपदावरुन हटविण्यात आलं होतं. त्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या पक्षात जातील, अशी चर्चा समोर आली होती. विशेष म्हणजे मोरे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर बोलताना आपल्याला सर्वच पक्षांच्या ऑफर आल्याचं उघडपणे म्हटलं होतं. त्यामुळे मनसेचा बडा नेता दुसऱ्या पक्षात जाणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. या दरम्यान राज ठाकरेंनी वसंत मोरेंना मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांची मनधरणी केली होती. त्यानंतर वसंत मोरेंना ठाण्यातील सभेचं निमंत्रण देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सभेदरम्यान मोरेंना भाषणाची संधी देण्यात आली होती. त्यावेळी मोरेंनी विरोधकांवर टीका करत आपण मनसे सोडून कुठेच जाणार नाहीत, असं स्पष्ट केलं होतं. गेल्या महिन्यात पुण्यात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून वसंत मोरे यांना डावलण्यात आल्याचा प्रयत्न केला गेला, अशी चर्चा रंगली होती. या प्रकरणी वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त करत आपण वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करु, असं म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडी ताज्या असाताना आता संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली. या भेटीमागे खरंच काही राजकीय कारण दडलंय का? ते आगामी काळात सर्वांसमोर येईल. पण तसं काही घडल्यास मनसेला मोठा फटका बसू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात