जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गणेश 'अथर्वशीर्ष' कोर्सला पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरूवात, कोर्सवरून घमासान!

गणेश 'अथर्वशीर्ष' कोर्सला पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरूवात, कोर्सवरून घमासान!

गणेश 'अथर्वशीर्ष' कोर्सला पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरूवात, कोर्सवरून घमासान!

गणपती अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरूवात झाली आहे, पण या कोर्सला विरोध सुरू झाला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 25 नोव्हेंबर : गणेश अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरूवात झाली आहे. विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे, पण या कोर्सला विरोध सुरू झाला आहे. प्राध्यापक हरी नरके यांनी या कोर्सला विरोध केला आहे. ‘पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्न ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,’ असं हरी नरके म्हणाले. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको, असा सवाल विचारला आहे. दरम्यान हा कोर्स कम्पलसरी नाही, ज्यांना नकोय त्यांनी जॉईन करू नये. आराधना धार्मिक कशी असू शकते? असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हरी नरकेंची टीका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठीला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,’ अशी टीका हरी नरके यांनी केली आहे. ‘संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत ते शिकवण्याऐवजी अभ्यासकांच्या मते अगदी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष संस्कृतची गोडी लावणे, मन:शांती व व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावणे कितपत योग्य?,’ असा सवाल हरी नरके यांनी विचारला आहे. पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये एबीव्हीपीचा झेंडा, फडणवीसांच्या भावाचा दणदणीत विजय ‘एखाद्या खाजगी संस्थेने काय करावे हा मुद्दा वेगळा आहे. माझा गणेश अथर्वशिर्षाला विरोध नाही. शासकीय अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठाने संविधानाच्या कलम ५१ चे पालन करण्याऐवजी असे एका धर्माचे लेखन विद्यापीठातर्फे शिकवणे,विद्यापीठाच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र देणे हा निर्णय चुकीचा आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक प्रबोधन यांचा मोठा वारसा आहे. याच न्यायाने उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील, हे सारे भयंकर आहे,’ असं हरी नरके म्हणाले. काय आहे कोर्स? सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात