पुणे, 28 नोव्हेंबर : पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला आहे. या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर तर एका बाईकटॅक्सीवाल्यालाही जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणामी या आंदोलनाला गालबोट लागलं आहे.
अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी
शहरात अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी (दुचाकी) सेवा दिली जाते. या सेवेला राज्य शासनाची परवनागी नाही. स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. महिलांसाठी ही सेवा सुरक्षीत नाही. तसेच, अशा बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणने आहे. याविरोधात रिक्षा संघटना एकवटल्यामुळे आरटीअंोकडून वेळोवेळी बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही सेवा पुर्णपणे बंद व्हावी, यासाठी रिक्षा संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
पुण्यात रिक्षा आंदोलनाला गालबोट, रिक्षाचालकांकडून बाईक टॅक्सी चालकाला मारहाण#PuneNews #BikeTaxi #MaharashtraNews #News18Lokmat pic.twitter.com/CAoRkojzTV
— News18Lokmat (@News18lokmat) November 28, 2022
काही संघटनांची बंदकडे पाठ
आज बेमुदत आंदोलन सुरू असताना काही संघटनांनी याला पाठिंबा दिला नाही. म्हणून शहरात अल्प स्वरूपात रिक्षा सुरू आहे.अस असताना आंदोलक हे आक्रमक झाले असून आंदोलकांच्या माध्यमातून एक रिक्षा फोडण्यात आली आहे.
वाचा - तरुणाला दगडाने मारहाण करत गोळीबार; कोरेगाव पार्कमधील घटनेचा Shocking Video
या संपात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 60 ते 60 हजार रिक्षाचालक सहभागी होणार असून आज पासून सकाळी 10 वाजल्यापासून संपला सुरुवात झाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमपीएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे म्हणाले, संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1700 बस प्रवाशांच्या सेवेत धावतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Autorickshaw driver, Pune