जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मनसे-भाजप युतीवर रामदास आठवलेंचं सर्वात मोठं विधान, आता पुढे काय होणार?

मनसे-भाजप युतीवर रामदास आठवलेंचं सर्वात मोठं विधान, आता पुढे काय होणार?

रामदास आठवलेंचं मनसे-भाजप युतीवर मोठं विधान

रामदास आठवलेंचं मनसे-भाजप युतीवर मोठं विधान

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर रामदास आठवलेंनी मोठं विधान केलं आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

गणेश दुडम, पुणे, 11 सप्टेंबर : राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील संबंध दृढ होताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते यांची जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडी या भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसाठी सकारात्मक आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये भाजप-मनसे यांच्यात युती झाली तर नवल वाटायला नको, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण भाजप आणि मनसे यांच्यात युती होऊ नये, असं भाजप पुरस्कृत एनडीएमध्ये सहभागी असलेले आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांचं मत आहे. त्यामुळे भाजप रामदास आठवले यांची याबाबतची सूचना ऐकून राज ठाकरेंपासून लांब जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरले. पण भाजपसाठी मनसे महत्त्वाची असेल तर रामदास आठवले हे नेमकं काय निर्णय घेतात हे देखील महत्त्वाचं असेल. युतीत मनसेला स्थान असू नये, असं स्पष्ट मत रामदास आठवले यांचं आहे. त्यांनी त्याबाबतचं विधान देखील केलं आहे. रामदास आठवले हे त्यांच्या रोखठोक आणि दिलखुलास स्वभावामुळे ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या मताचा विचार भाजप करेल, अशी शक्यता आहे. भाजपसाठी राज ठाकरे यांची मनसे जितकी जरुरीची आहे तितकेच जरुरीचे रामदास आठवले देखील आहेत. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालेलं आहे. त्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार ते महत्त्वाचं ठरेल. रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? “आरपीआय आणि भाजपच्या युतीत मनसेला घेऊ नये. असं झाल्यास भाजपचं देश पातळीवर मोठं नुकसान होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेसोबत युती करणार नाही”, असा शब्द दिल्याचा दावा आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. लोणावळ्यात आरपीआयचा कार्यकारणी मेळावा पार पडला. त्यानंतर आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चेवर भाष्य केलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपशी जोडला गेल्याने युतीची ताकद वाढली आहे. अशा परिस्थितीत विभिन्न विचारसरणीच्या मनसेशी युती करू नये, अशी आरपीआयची भूमिका आहे”, असं रामदास आठवले म्हणाले. ( दादरनंतर ऐरोवलीत कार्यकर्त्यांचा राडा, शिवसेना-भाजप समर्थक आमनेसामने, पाहा मारहाणीचा VIDEO ) “दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवाजी पार्क मैदान मिळावं. यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. मुंबई महापालिकेने खरी आणि ताकदवान शिवसेना कोणती हे पाहून निर्णय घ्यावा”, असा सल्लाही आठवलेंनी यावेळी दिला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केलेलं गणपती विसर्जनाच्या प्रश्नावर रामदास आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला. पण राणा दाम्पत्याने गणपतीचं विसर्जन ज्या पद्धतीने केलं, त्यावर भाष्य करणं मात्र आठवलेंनी टाळलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात