मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याच्या तरुणाची कमाल, असं काम केलं की थेट Apple ने दिलं लाखोचं बक्षीस; वाचा सविस्तर

पुण्याच्या तरुणाची कमाल, असं काम केलं की थेट Apple ने दिलं लाखोचं बक्षीस; वाचा सविस्तर

आशिष धोने या तरुणाने Blind XSS हे बग शोधून काढले आहे.

आशिष धोने या तरुणाने Blind XSS हे बग शोधून काढले आहे.

आशिष धोने या तरुणाने Blind XSS हे बग शोधून काढले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : तुमच्यापैकी अनेकांनी Bug Bounty या प्रोग्रामचं नाव ऐकलं असेल. या प्रोग्रामच्या माध्यमातून अनेक टेक कंपन्या आपल्या प्रॉडक्टमध्ये अडचण (बग) शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देत असतात. पुण्यातील एका तरुणाने असा एक बग शोधून काढला आहे. भल्याभल्यांना जे जमलं नाही ते या तरुणाने करुन दाखवलं आहे. आशिष धोने असे या तरुणाचे नाव आहे. त्याला थेट अॅपल कंपनीने बक्षिस दिलं आहे.

लिंक्डइनवर दिली माहिती -

आशिष धोने या तरुणाने Blind XSS हे बग शोधून काढले आहे. त्यामुळे आशिषला थेट अॅपलकडून 7 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 5 लाख 58 हजार 890 रुपये, इतकं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवरुन त्याने याबाबत माहिती दिली. याबाबत आशिष याने सांगितले की, याआधी त्याने Apple Teacher Learning Center पोर्टलला हॅक केले होते आणि मग नंतर ॲपलने या पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले आहेत. मात्र, यानंतरही त्याने या पोर्टलला हॅक करून दाखवलं. तसेच या बग नंतर आशिषने ॲपल कंपनीला याबाबत माहिती दिली. आशिषच्या या कामगिरीमुळे त्याला अॅपलने बक्षीस जाहीर केले आहे.

आशिषने लिंक्डइन प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड गुगल हॅकर्सच्या टॉप 120 लिस्टमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे. 2021 मध्ये त्याला बंग हंटरचा किताबही मिळाला आहे. आशिषने आपल्या लिंक्डइन पोस्टमघध्ये ॲपलच्या मेलचा स्क्रीनशॉटही टाकला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये बग रिपोर्ट करण्यासाठी बक्षीस दिल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा - प्रेरणादायी! पती-पत्नीची कमाल, MPSC उत्तीर्ण होऊन एकाच वेळी बनले क्लास अधिकारी

आशिषला ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, आपण पाठवलेला रिपोर्ट Apple Security Bounty साठी पात्र ठरला आहे. तसेच ॲपल तुम्हाला 7 हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत आहे. ही काही पहिली संधी नाही. याआधीही अनेकांना बग बाउंटी अंतर्गत बक्षीस देण्यात आले आहे.

First published:

Tags: Apple, Hacking, Prize, Pune