मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेरणादायी! पती-पत्नीची कमाल, MPSC उत्तीर्ण होऊन एकाच वेळी बनले क्लास अधिकारी

प्रेरणादायी! पती-पत्नीची कमाल, MPSC उत्तीर्ण होऊन एकाच वेळी बनले क्लास अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे.

  • Published by:  News18 Desk
अहमदनगर, 28 ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. अहमदनर जिल्ह्यातून स्पर्धा स्पर्धा परिक्षेशी संबंधित एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या एका पती पत्नीने स्पर्धा परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. क्लास वन अधिकारी पदावर रुजू होतील - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे. सुरेश चासकर व मेघना चासकर, अशी या उत्तीर्ण यशस्वी झालेल्या अधिकारी पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत दोघांची वर्ग 1 पदी निवड झाली आहे. हे दोन्ही जण आता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदावर रुजू होतील. सुरेश व मेघना हे दोन्ही जण मे 2022 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव हे आहे. तर कैलास दरेकर व जयश्री दरेकर या दाम्पत्याच्या त्या कन्या आहेत. तसेच सुरेश हे सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे रहिवाशी असून कै. भास्कर रामभाऊ चासकर यांचे चिरंजीव आहेत. नोकरी व कार्यभार सांभाळून या दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाल्याचे दोघांनी म्हटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विविध पदांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जाते. आयोगाने नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित केला,. यात उत्तीर्ण उमेदवारांच्या अंतिम यादीत पती पत्नीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मेघना यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदवी काळातच स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू ठेवली होती. हेही वाचा - स्पर्धा परीक्षा कुठलीही असो आता English चं टेन्शन घेऊच नका; या टिप्समुळे क्रॅक होईल Exam वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग उत्तीर्ण होण्याची किमया दोघांनी साधली आहे.  लग्नानंतरही दोघे पुन्हा परीक्षेला सामोरे गेले आणि अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली. पती व पत्नीने एकाचवेळी मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
First published:

पुढील बातम्या