जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात उच्चशिक्षित सुनेसोबत धक्कादायक कृत्य, काळे कपडे घालू नको....

पुण्यात उच्चशिक्षित सुनेसोबत धक्कादायक कृत्य, काळे कपडे घालू नको....

पुण्यात उच्चशिक्षित सुनेसोबत धक्कादायक कृत्य, काळे कपडे घालू नको....

काळ्या कपड्यांवरून उच्चशिक्षित सुनेचा छळ, पुण्यातील धक्कादायक घटना

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे : पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळीकडून सुनेवर दबाव टाकण्यात आला. शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. उच्च शिक्षित सुनेसोबत सासच्या मंडळींनी अघोरी प्रकार केला आहे. सुनेला मूल होण्यासाठी सतत तगादा लावला जात होता. यासाठी तिला मानसिकरित्या तिला त्रास देण्यात आला. तिच्यावर अघोरी प्रकार करण्यात आले. हे वाचा- आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रानडुक्कराचा हल्ला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर मूल होत नसल्याचा बहाणा देत तिला काळे कपडे घालण्यासाठी विरोध दर्शवण्यात आला. सासरच्यांविरोधात पीडित सूनेनं पुणे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मूल होत नसल्याने सासरची मंडळी आणि नवरा तिला मानसिकरित्या त्रास देत होते. त्यांनी काळे कपडे घालण्यासही विरोध केला. हे वाचा-विद्यार्थ्यांना तब्बल चार तास वर्गाबाहेर बसवलं, उरणमध्ये नामांकित शाळेचा संतापजनक प्रकार जर तू काळे कपडे घातले तर तुला मुलगा होणार नाही असं सासरचे मंडळी सांगत होते. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात