मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पूल पाडला मात्र...चांदणी चौकातील वाहतूक कधी येणार रुळावर?

पूल पाडला मात्र...चांदणी चौकातील वाहतूक कधी येणार रुळावर?

20 मिनिटांसाठी ब्लॅाक असेल अशी सूचना असताना दीड तास हायवे बंद करण्यात आला होता.

20 मिनिटांसाठी ब्लॅाक असेल अशी सूचना असताना दीड तास हायवे बंद करण्यात आला होता.

20 मिनिटांसाठी ब्लॅाक असेल अशी सूचना असताना दीड तास हायवे बंद करण्यात आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 3 ऑक्टोबर : पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात होते. रात्री उशिरा 2.33 वाजेच्या सुमारास चांदणी चौकातून पूल स्फोटकांनी पाडण्यात आला. नियंत्रिक स्फोटाद्वारे हा पूल अवघ्या 5 सेकंदात स्फोटकांनी पाडण्यात आला होता. यादरम्यान रात्री 11 वाजल्यापासून या परिसरात नागरिकांना प्रवास करण्यास बंदी आणली होती.

दरम्यान आजही चांदणी चौक परिसरातील खडक फोडण्यासाठी ब्लास्ट करण्यात आला होता. ब्लास्टनंतर खडक महामार्गावर आल्याने मुंबई बंगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर मोठ्या प्रमाणात राडारोडा जमा झाला होता.

20 मिनिटांसाठी ब्लॅाक असेल अशी सूचना असताना दीड तास हायवे बंद करण्यात आला होता. आता हायवे सुरू झाला असला तरी ट्रॅफिक कायम असल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

5 सेकंद अन् पुण्यातला चांदणी चौकातला पूल झाला जमीनदोस्त, पहिला VIDEO

चांदणी चौकातील पूल पडला मात्र...

चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र रस्ता रूंदीकरणाचं काम सुरू आहे. रस्त्यालगतचे मोठाले दगड ब्लास्ट करून फोडण्यात येत आहे. या स्फोटानंतर रस्ताभर राडारोडा पसरला जात असल्याने वाहतुकीला अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस येथून प्रवास करताना प्रवाशांना याचा सामना करावा लागू शकतो. रस्त्याच्या रूंदीकरणासाठी स्फोट करणं आवश्यक आहे, आणि याचा परसणारा राडारोडा पाहता वाहतूक काही वेळासाठी थांबवली जाते.

First published:

Tags: Pune