मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

5 सेकंद अन् पुण्यातला चांदणी चौकातला पूल झाला जमीनदोस्त, पहिला VIDEO

5 सेकंद अन् पुण्यातला चांदणी चौकातला पूल झाला जमीनदोस्त, पहिला VIDEO

पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे.

पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे.

पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 02 ऑक्टोबर : पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे. पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने अवघ्या 5 सेकंदामध्ये पूल पाडण्यात आला आहे. पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम सुरू असून सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक सुरू होणार आहे.

चांदणी चौकातील पूल पाडण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. रात्रीपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर २.३३ वाजेच्या सुमारास पूल स्फोटकांनी पाडण्यात आला.

पुल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते. सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष गुप्ता यांनी व्यक्त केला.

तर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडली. ते स्वत: नियंत्रण कक्षात बसून होते.

असा पाडला पूल

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले होते. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम फत्ते करण्यात आली.

(पुणेकरांना नडला, 'तो' मध्यरात्रीच पाडला, चांदणी चौकातील पुलाचे PHOTOS)

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून 200 मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.

(पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील थरारक Video, कागदपत्रंही गेली उडून)

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जाते. 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, 2 अग्निशमन वाहन, 3 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण 210 कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले.

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण 3 पोलीस उपायुक्त, 4 सहायक आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 46 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच 355 पोलीस कर्मचारी असे एकूण 427 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

First published:

Tags: Marathi news