पुणे, 9 ऑगस्ट : देशात आदराने ज्या उद्योगपतीचं नाव घेतलं जातं त्यापैकी एक म्हणजे टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा. पुण्यातील रेपोस एनर्जी या स्टार्ट कंपनीच्या आदिती भोसले वाळुंज यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या भेटीचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. काय आहे हा किस्सा - पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी नावाचा स्टार्टअप सुरू केला होता. त्यांनी आता मोबाइल ऊर्जा वितरण स्टार्टअप रेपोस एनर्जीने सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ‘मोबाइल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल’ लाँच केले आहे. हे स्टार्टअप उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीच्या गुंतवणुकीतून सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दिवसात आदिती यांनी रतन टाटा यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. टाटा ग्रुपचे रतन टाटा यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे, असे आदिती आणि चेतन यांचे स्वप्न होते. जेव्हा आम्ही स्टार्टअप सुरू केले तेव्हा लिंक्डइनवर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रतन टाटा जर मेंटर झाले तर चांगले होईल, असे म्हटले होते. यावर अनेक जणांनी ही गोष्ट अशक्य आहे, हे शक्यच नाहीए, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, तरी आम्ही आशा सोडली नाही, असे आदिती यांनी सांगितले. समोरची व्यक्ती म्हणाली मी रतन टाटा बोलतोय… त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही एक प्रोजेक्टचे थ्रीडी प्रेजेंटेशन तयार केले होते आणि एक पत्र रतन टाटा यांना पाठवले. त्यावर तिकडून कोणतेच उत्तर आले नाही. आम्ही (आदिती आणि चेतन) रतन टाटांच्या घरापर्यंत पोहोचलो. त्यांच्या घराबाहेर जवळ जवळ आम्ही तब्बल 12 तास होतो. मात्र, त्यांची भेट काही झाली नाही आणि परिणामाी निराश होऊन आम्हाला परतावे लागले. मात्र, वाट पाहणे वाया गेले नाही. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये परतलो तेव्हा एक फोन आला. समोरून आवाज आला की हॅलो, मी आदितीशी बोलू शकतो का? त्यावर मी उत्तर दिले हो मी आदिती बोलत आहे, आपण कोण आहात. यावर ती समोरची व्यक्ती म्हणाली की, मी रतन टाटा बोलत आहे. मला तुमचे पत्र मिळाले आहे. आपण भेटू शकतो का? यानंतर दुसऱ्याच दिवशी रतन टाटा यांना भेटण्याचे निश्चित केले. हेही वाचा - Ratan Tata: व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा रतन टाटांचे प्रेरणादायी विचार एक निळा शर्ट घातलेला एक उंच, गोरा माणूस आमच्या दिशेने चालू लागला आणि शांत वाटत होता. आमची त्यांच्यासोबत तब्बल 2 तास मिटिंग झाली. त्यानंतर टाटा समूहाकडून 2019 आणि 2022 मध्ये अशी दोन वेळा गुंतवणूक करण्यात आली. रतन टाटांनी स्टार्टअपमध्ये रस घेतला आणि गुंतवणूक केली. यामुळे आज रेपोस एनर्जी एका मोठ्या उंचीवर पोहोचले आहे. या घटनेला ३ वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी ही भेट आणि त्यानंतरचा रपोस एनर्जीचे यश चर्चेचा विषय झाला आहे. हा एक असा क्षण होता जेव्हा एक मोठे स्वप्न पूर्ण झाले होते. हेही वाचा - Katraj Dairy : रोज 2.50 लाख लीटर दूध पोहचवणारा पुणे जिल्ह्यातील ब्रँड, पाहा VIDEO रतन टाटा यांना आम्ही आमची संकल्पना सांगितल्यावर त्यांनी ती शांतपणे ऐकूण घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी या भेटीदरम्यान, त्यांचे अनुभवही आमच्यासोबत शेअर केले. देशाला जागतिक पातळीवर नेण्यास मदत करा. आम्हाला मार्गदर्शन करा, असं आम्ही उत्तरलो. त्यांनी फक्त ठिक आहे, असे उत्तर दिले आणि आम्ही दोन्ही तिथून बाहेर पडलो, या शब्दात आदिती यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







