जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Katraj Dairy : रोज 2.50 लाख लीटर दूध पोहचवणारा पुणे जिल्ह्यातील ब्रँड, पाहा VIDEO

Katraj Dairy : रोज 2.50 लाख लीटर दूध पोहचवणारा पुणे जिल्ह्यातील ब्रँड, पाहा VIDEO

Katraj Dairy : रोज 2.50 लाख लीटर दूध पोहचवणारा पुणे जिल्ह्यातील ब्रँड, पाहा VIDEO

पुण्यातील कात्रज येथे असणारी पुणे जिल्हा दूध संघाची ( Dudh Sangh ) ‘कात्रज डेअरी’ ही ( Katraj Dairy ) पुण्यातील सर्वात जुनी सहकारी तत्त्वावर चालणारी डेअरी आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 9 ऑगस्ट :  पुणे ( Pune City ) आणि तिथे असणाऱ्या विविध सहकारी तत्त्वावरील संस्था या नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. पुण्यातील कात्रज येथे असणारी पुणे जिल्हा दूध संघाची ( Dudh Sangh ) ‘कात्रज डेअरी’ ही ( Katraj Dairy ) पुण्यातील सर्वात जुनी सहकारी तत्त्वावर चालणारी डेअरी आहे. कात्रज डेअरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या डेअरीची उलाढाल सातत्यानं वाढत आहे. या डेअरीची खासियत अशी आहे की येथे नेहमीच्या बाजारभावापेक्षा कमी बाजारभावामध्ये चांगल्या गुणवत्तेचे दूध आणि दुधाचे पदार्थ मिळतात. चला तर या डेअरी बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया… 1960 साली स्थापन झालेले कात्रज डेअरी तब्बल 62 वर्षापासून पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. या डेअरी मध्ये सुरुवातीला 16 हजार लिटर दूध संकलन व्हायचे तर आता पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुके सोडून उर्वरित तालुक्यामधून तब्बल 2.50 लाख लीटर दूध संकलन दिवसाला होते. पुण्यातील गावोगावी जाऊन व्यवस्थापनाद्वारे हे दूध संकलन केले जाते.

    हेही वाचा-  Nashik : फक्त 40 रूपयांमध्ये खा पोटभर बिर्याणी; चवही असते एकदम झकास, VIDEO

    ना नफा ना तोटा या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या सोबतच ग्राहकांचा देखील फायदा  याबाबत कात्रज डेअरीच्या पहिल्या महिला चेअरमन केशरताई पवार यांनी सांगितले की, गेल्या 62 वर्षापासून कात्रज डेअरी ही आपल्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. ही डेअरी सहकार तत्वावर चालत असल्यामुळे ना नफा ना तोटा या पद्धतीने या डेअरीमुळे शेतकऱ्यांच्या सोबतच ग्राहकांचा देखील फायदा होतो. सरकारने ठरवून दिलेल्या रेट प्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या दूध संकलनाचा मोबदला देतो. तसेच आम्ही ग्राहकांना बाजारभावापेक्षाही कमी किमतीमध्ये चांगल्या गुणवत्तेचे दूध उपलब्ध करून देतो. यामुळे 60 ते 65 हजार शेतकरी आमच्या संस्थेला जोडले गेलेले आहेत. या शेतकऱ्यांतर्फे रोज 2.50 लाख लीटर दूध आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. पुढे बोलताना त्या म्हणतात की, या संस्थेमध्ये निवडणुकीद्वारे संचालक मंडळ ठरते. यामुळे कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आहे. या डेअरीद्वारे ग्राहकांचे हित जपण्यासाठी आम्ही नेहमीच  प्रयत्नशील असतो. यासोबतच आमच्या येथे दूध संकलन करणारे शेतकरी आणि गवळी यांचा देखील फायदा व्हावा यासाठी आम्ही  बाजारभावापेक्षाही त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यानुसार चांगले पैसे देतो. एवढंच नाही तर आम्ही शेतकऱ्यांना दर दहा दिवसानंतर त्यांचा मोबदला देतो. यामुळे शेतकऱ्याला महिनाभर मोबदल्याची वाट पाहण्याची वेळ येत नाही. त्यांच्या हातात त्यामुळे पैसा खेळता राहतो.

     हेही वाचा-  Osmanabad : उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

    दुधा पासून बनवले जातात हे पदार्थ  डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर यांनी सांगितले की, आमच्या डेअरीमध्ये चार प्रकारचे दूध मिळते. पनीर, लस्सी, ताक, जीरा ताक, अंजीर बर्फी, पेढे, खवा, काजूकतली, विविध दुग्धजन्य मिठाई आमच्या डेअरीमध्ये बनवले जातात आणि याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 800 पेक्षाही जास्त केंद्रावरून आम्ही दूध संकलन करतो आणि लाखो लोकांपर्यंत हे दूध आम्ही पोहोचवतो. पुणे जिल्हातील गावोगावी जाऊन सक्षम वाहतूक व्यवस्थापनाद्वारे हे दूध संकलन केले जाते. पुणे जिल्हा दूध संघाची ही डेअरी कात्रज येथे असल्यामुळे या डेअरीला कात्रज डेअरी हे नाव मिळाले आहे. कात्रज डेअरीला आयएसओ मानांकन आहे. यासोबतच कात्रज दूध डेरी ही ऊर्जा बचतीभर देणारी दूध डेअरी आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे कात्रज डेरी महिन्याला 15 ते 20 लाख रुपये वाचवते. गुगल मॅप वरून साभार  पुण्यात कुठे आहे कात्रज डेअरी? कात्रज डेअरी, FV35+M67, पुणे - सातारा रोड, कात्रज, पुणे, महाराष्ट्र 411046 हा डेअरी चा पत्ता आहे . तुम्हाला जर कात्रज डेअरी मधून दूध किंवा पदार्थाची खरेदी करायची असेलतर तुम्ही https://katrajdairy.com या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी 8380014437 या मोबाईल क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता. 

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pune
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात