जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune School Reopen: पुण्यातील शाळा, महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार, पालकमंत्री अजित पवारांची माहिती

Pune School Reopen: पुण्यातील शाळा, महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार, पालकमंत्री अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

Pune School Colleges reopen: पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील निर्णय कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 29 जानेवारी : पुण्यातील कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. त्यासोबतच लसीकरणही (Vaccination) वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू (Pune school colleges reopen) करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण ग्रामीण भागात चांगले सुरू आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी दोन्ही डोस घ्यायला हवेत. 9वीपासून शाळा सुरू होणार आहेत. (Pune School Colleges reopen from 1st February said Ajit Pawar) पहिली ते आठवीचे वर्ग चार तासच 9वी पासून पुढचे सर्व वर्ग पूर्ण वेळेत भरवण्यात येणार आहेत. तर पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जाणार असल्याची माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. शाळेत लसीकरण 9वी, 10वी आणि 11वीच्या (15 ते 18 वयोगटातील) या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुविधा करण्यात येणार आहे. त्या परिसरात रुग्णवाहिका, एक पर्यायी रूम, डॉक्टर, परिचारिकांची टीम असेल. त्या संदर्भातील सूचना शाळा, संस्था चालकांना कळवण्यात येतील असंही अजित पवारांनी म्हटलं. वाचा : महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवली जाणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती पुण्यातील रुग्णसंख्येत घट अजित पवारांनी पुढे म्हटलं, ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 86 टक्के इतके झालं आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुलनेने कमी लसीकरण झालं आहे. जागतिक रुग्ण पाहता मोठी लाट आहे. काल आणि परवा दोन दिवसांत पुण्यातील रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांनी घ्यावा मुंबई प्रमाणेच आता पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट कमी होताना दिसतेय. असे असले तरी लोकांनी काळजी घ्यावी. मुलांना शाळेत पाठवायचा निर्णय हा पालकांनीच घ्यायचा आहे. कोणतीही सक्ती नसेल. सुरूवातीला शाळेत येण्याचं कोणतंही बंधन नसेल असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. वाचा :  मुंबईकरांना मोठा दिलासा! धारावीत कोरोनाचा दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही मास्कमुक्तीच्या बातम्या खोट्या महाराष्ट्रात मास्क मुक्ती होणार असल्याच्या बातम्यांवर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, मास्क मुक्ती संबंधीची बातमी खोटी आहे. कॅबिनेटमध्ये अजिबात तशी चर्चाच झालेली नाही. मग तरीही धादांत खोट्या बातम्या का दिल्या जातात असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात