बारामती, 07 सप्टेंबर : बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे. (Pune Rain Alert) बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.
पुरंदर आणि बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने ओढेनाले भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे कोरडी असणारी कऱ्हा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. नाजरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बारामती परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस, अनेक गावांतील ओढ्या-नाल्यांना पूर#rain #monsoon pic.twitter.com/Z0HKSCgWga
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2022
हे ही वाचा : पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमचे पैसे करेल डबल, कुठे आणि कशी कराल गुंतवणूक?
राज्यात पावसाचा येलो अलर्ट
राज्यातील काही जिल्हे सोडता अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाने थैमान घातले आहे.. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. (Rain Alert Maharashtra) आजपासून (ता.07) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गणपती विसर्जनावेळी नागरिकांची तारांबळ उडण्यचाी शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, बगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Good Thoughts: फक्त लढ म्हणा! व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा प्रेरणादायी मराठी सुविचार, लाईक, कमेंटचा पडेल पाऊस
राज्यातील विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.