पुणे, 24 डिसेंबर: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये रात्रीच्या सुमारास तरुणाची गोळ्या घालून हत्या (youth was shot dead) करण्यात आली आहे. 10 दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे. शेलपिंपळगाव गावच्या भर चौकात ही निघृण हत्या केली. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दबा धरुन बसलेल्या चार अज्ञात तरुणांनी गाडीवर गोळीबार करत हत्या केली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे. नागेश कराळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या चार गोळ्या झाडल्यात. घटनेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबारात हत्या झालेल्या तरुणाची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा हत्येचा थरार,
— News18Lokmat (@News18lokmat) December 24, 2021
10 दिवसातील हत्येची तिसरी घटना pic.twitter.com/esDFSjuXAC
दरम्यान आताच आलेल्या ताज्या अपडेटनुसार, खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील तरुणाच्या हत्येनंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसंच जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी: राज्यातल्या Omicron रुग्णांमध्ये दोन वर्षांचा चिमुरडाही 10 दिवसातील हत्येची तिसरी घटना आहे.शनिवारी पिंपळेगुरवमध्ये भरदिवसा एकावर गोळीबार झाला. बुधवारी तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हातोड्यानं वार करुन हत्या केली. गुरुवारी तिसरी घटना गोळीबाराची घडली