मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यातल्या Omicron बाधितांमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश, उस्मानाबादमध्ये पिता-पुत्र पॉझिटिव्ह

राज्यातल्या Omicron बाधितांमध्ये 2 वर्षांच्या मुलाचा समावेश, उस्मानाबादमध्ये पिता-पुत्र पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसचा (corona virus)  ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसचा (corona virus) ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे.

कोरोना व्हायरसचा (corona virus) ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे.

उस्मानाबाद, 24 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona virus) ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) या व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुन्हा एकदा उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आता तब्बल 23 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 22 डिसेंबर या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात (Maharashtra) एकही रुग्ण आढळला नव्हता.

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या 5 रुग्णांपैकी 1 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ओमायक्रॉनचे 5 रुग्ण झालेत.

हेही वाचा- 15 वर्ष खेळून थकला! बांगलादेशच्या अव्वल खेळाडूनं दिले निवृत्तीचे संकेत 

मोहा येथील 31 वर्षीय पिता आणि त्यांच्या 2 वर्षीय मुलाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहा येथील व्यक्ती घाना देशातून आली होती. त्यांना आणि त्यांच्या 2 वर्षीय मुलाला या अगोदर कोरोनाची लागण झाली होती.

राज्यात काल तब्बल 23 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळून आले. काल आढळलेल्या 23 रुग्णांमध्ये पुण्यातील (Pune) रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात तब्बल 13 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण आणि मनपा हद्दीत प्रत्येकी तीन आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सात नव्या रुग्णांचा समावेश आहे.

राज्यातील इतर भागात किती रुग्ण आढळले?

पुण्यापाठोपाठ मुंबईत पाच नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. तर उस्मानाबादमध्ये दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर मनपा हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. यातील 22 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर 1 रुग्ण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने रिपोर्ट केला आहे. या नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा अधिकृत आकडा हा 88 वर पोहोचला आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संख्या चक्क दुपटीने वाढली आहे कोरोना हा गुणाकार करतो. एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली तर ती दुप्पट किंवा तीनपटीने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. मुंबईत काल 602 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 22 डिसेंबरला हीच संख्या 490 इतकी होती. त्याआधी हीच संख्या 327 इतकी होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज आता वाढताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत काल कोरोनामुळे एका रुग्णाची मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे मुंबईत काल दिवसभरात 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 2813 इतकी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा 1747 इतका आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus cases, Maharashtra News