मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'राज्यपालांचं' धोतर फाडलं, पुण्यात अनोखं आंदोलन, VIDEO

...आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'राज्यपालांचं' धोतर फाडलं, पुण्यात अनोखं आंदोलन, VIDEO

राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात आणखी एक वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 21 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताज्या वक्तव्याने राज्यभरात वादंग उठलाय. 'छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत', असं राज्यपालांनी म्हटलं होतं. यावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात अनोखे आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे पुण्यात अनोखे आंदोलन -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्याचा निशेष म्हणी पुण्यात आजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. यात डमी भगतसिंग कोश्यारींचं धोतर फाडून निषेध व्यक्त करण्यात आल्या. तसेच यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला.

सुषमा अंधारेंची राज्यपालांवर जोरदार टीका -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. 'आरएसएसच्या शाखेतून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. तेव्हाच प्रश्न विचारले असते तर आज काळा टोपीवाला असं बोलला नसता,' अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा - 'राज्यपालांनी माती खाल्ली, महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, नाहीतर..'; ठाकरे गटाची जहरी टीका

'नुसतं डोळ्याला पाणी लावून नमो नमो करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. राज्यपाल निरपेक्ष असले पाहिजेत. आताचे राज्यपाल म्हणजे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते वाटतात. जर गडकरी भाजपला आदर्श वाटत असतील, तर मोदींसाठी गडकरींना अडगळीत का टाकलं? तेव्हा राज्यपाल कुठे गेले होते?' असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी विचारला.

शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल!, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Governor bhagat singh, NCP, Pune