मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यातील इस्कॉन मंदिरात कसा साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव, पाहा VIDEO

पुण्यातील इस्कॉन मंदिरात कसा साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव, पाहा VIDEO

पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवरचे इस्कॉन मंदिर ( iskcon temple in pune ) हे पुण्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणून मानले जाते.

पुणे, 18 ऑगस्ट : जगभरामध्ये श्री कृष्णाचे भक्त असंख्य आहेत आणि या सर्व भक्तांसाठी जगभरातील 170 देशांमध्ये 720 ठिकाणी इस्कॉन संस्थेतर्फे श्री कृष्णाची मंदिरे उभारली गेली आहेत. यातीलच पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवरचे इस्कॉन मंदिर ( iskcon temple in pune ) हे पुण्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणून मानले जाते. तब्बल पाच एकर परिसरामध्ये हे मंदिर असून इथे दररोज हजारो भाविक येत असतात. इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नेमका इस्कॉन मंदिरात कश्या पद्धतीने श्री कृष्ण जन्म महोत्सव साजरा केला जातो हे पाहूया. 

इस्कॉन मंदिराचा इतिहास 

2006 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. इस्कॉन मंदिर 2013 मध्ये भाविकांसाठी खुले करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. या मंदिरात मुख्य राधा कृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. व्यंकटेश्वर मंदिर दक्षिण भारतीय कोटा दगड वापरून वास्तू शैलीमध्ये उभारले गेले आहे. तर राधाकृष्ण मंदिर उत्तर भारतीय लाल दगड आणि संगमरवरी वास्तू शैलीमध्ये बांधले गेले आहे.

हेही वाचा :  Nashik : 197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम, पाहा VIDEO

श्री कृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो

याबाबत मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले सांगतात की, पुण्यात कात्रज कोंढवा रोड इथे इस्कॉन मंदिर आहे. सोन्याचा घुमट आणि झुंबर तसेच व्हरांडा असलेले राधाकृष्णाला समर्पित असलेले भव्य मंदिर. पुण्यातील इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्री कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. पण इस्कॉन मंदिरात दहीहंडी साजरी न करता जन्माष्टमीचा 10 दिवसाचा महोत्सव साजरा केला जातो. यात धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन, कीर्तन आणि प्रसाद अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुगल मॅप वरून साभार

हे कार्यक्रम साजरे होतात 

इस्कॉन ही एक आध्यात्मिक संस्था असल्याने या मंदिरात भक्तिभावाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सकाळी 4.30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमाला सुरूवात होते. सकाळी साडेचार वाजता आरती होते. त्यानंतर साडे सात वाजता शृंगार दर्शन होते. दुपारी 1.30 वाजेपर्यंत मंदिर उघडे असते त्या नंतर दुपारी 4.30 ते रात्री 8.45 वाजेपर्यंत मंदिर उघडे असते.

First published:

Tags: Pune