मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : 197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम, पाहा VIDEO

Nashik : 197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम, पाहा VIDEO

आज राज्यात सर्वत्र श्री कृष्ण जन्माष्टमी ( Krishna Janmashtami ) सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे.

  नाशिक 18 ऑगस्ट : आज राज्यात सर्वत्र श्री कृष्ण जन्माष्टमी ( Krishna Janmashtami ) सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यामुळे भाविकांची श्री कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गर्दी बघायला मिळत आहे. नाशिक ( Nashik ) मधील 197 वर्ष जुने मुरलीधर मंदिरात ही ( Murlidhar Temple ) भाविकांनी आज सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली असून श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करत आहेत. चला तर आज श्री कृष्ण जन्माष्टमी निम्मिताने याचं मुरलीधर मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. ऐतिहासिक मुरलीधर मंदिर नाशिकच्या कापड बाजारातील मुरलीधर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. 1825 साली गणराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. गोदावरीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर लाकडी जुन्या ठेवितील बनवलेलं आहे. मंदिरात गेल्यानंतर मन अगदी शांत होत आणि प्रसन्न वाटत. मंदिरात असलेली श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक आहे. श्री कृष्णाची बालमूर्ती आहे मूर्तीकडे बघितल की श्री कृष्णाच सावळ गोजिरवान रूप आठवत. दररोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. उत्सव काळात भाविकांची अलोट गर्दी असते, अशी माहिती मंदिरातील पुजारी संदेश संत यांनी दिली आहे. हेही वाचा : Dahi Handi : दहीहंडीवरील निर्बंध उठले तरी बाजारात उठाव नाही, विक्रेत्यांचं टेन्शन वाढलं! VIDEO कुठे आहे मुरलीधर मंदिर श्री कृष्णाचे हे ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर सराफ बाजारालगत असलेल्या कापड बाजारात मुरलीधर मंदिर आहे. सिबीएस बस स्थानकापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा खाजगी वाहनाने आपण मंदिरापर्यंत पोहचू शकतो.

  गुगल मॅपवरून साभार

  मुरलीधर मंदिरातील आरतीची वेळ  मंदीर सकाळी भाविकांसाठी 7 वाजता उघडते तर रात्री 10 वाजता बंद होते. मंदिरात सकाळी व सायंकाळी 8 वाजता आरती होत असते. आरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात. श्री कृष्णाची आरती ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू

  हेही वाचा :  Osmanabad : भक्तीत तल्लीन होऊन तुडवलं स्वत:चं मुल!; मंदिरात आजही तरंगतात विटा

  लाखो भाविक या ठिकाणी आनंदाने येतात या मंदिरात मी अगदी लहान असताना पाच ते सहा वर्षांची असल्यापासून येते. या मंदिरात आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते. प्रसन्न वाटत भगवान श्री कृष्ण लहान असतानाची ही मूर्ती आहे. मनमोहक ही मूर्ती आहे. मंदिरात दररोज भजन कीर्तन होत असते. पुजा होते प्रसादाचा कार्यक्रम होतो. मंदिरात आल की भगवान श्री कृष्णाला भेटल्या सारखं वाटत, अशी प्रतिक्रिया आशा मनद्रे यांनी दिली आहे. आम्ही प्रत्येक दिवशी तर मंदिरात येतोच मात्र श्री कृष्ण जन्माष्टमीला सर्व मैत्रिणी अगदी आनंदाने मंदिरात येतो. मंदिरात प्रसन्न वातावरण असते. इथे आलो की श्री कृष्णाचे छान भजन म्हणतो या वातावरणात दिवसभर रमून जातो लाखो भाविक या ठिकाणी आनंदाने येतात, अशी प्रतिक्रिया प्रभावती निजामपुरकर यांनी दिली आहे.
  First published:

  Tags: Nashik

  पुढील बातम्या