जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्याची मुंबई होतेय? तुफान पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप, FC रोडवरील Video पाहिला का?

पुण्याची मुंबई होतेय? तुफान पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप, FC रोडवरील Video पाहिला का?

पुण्याची मुंबई होतेय? तुफान पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरुप, FC रोडवरील Video पाहिला का?

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 14 ऑक्टोबर : जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. होत असलेल्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात आज जोरदार हजेरी लावली. राज्यभर परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात देखील पावसाची संततधार सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर रस्त्यावरील दिवेघाटात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच घाटातील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आले आहे. दरम्यान, मस्तानी तलाव हा ओसंडून वाहत आहे. भयंकर Video : पुण्यात परतीच्या पावसाने झोडपलं, मस्तानी तलावाचं रौद्र रूप दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एफसी रोडवर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत मुंबई आणि उपनगरात पाणी साचल्याच्या बातम्या येत होत्या. यंदाच्या पावसात मात्र पुण्यातही ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना पाहायला मिळाल्या.

तळकोकणातील पावसाचं जोरदार बॅटिंग… राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून तळकोकणात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे आज नद्या नाल्यात अक्षरशः पूर स्थिती निर्माण झाली. मुंबई - गोवा महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुमारे 3- 4 फुटापर्यंत पाणी आले. त्यामुळे कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील पोलीस चेकपोस्टच्या कार्यालयात पाणी शिरले. पाण्याचा सुस्थितीत निचरा होत नसल्याने व महामार्ग प्राधिकरण विभागाने तशी व्यवस्था न केल्याने स्थानिकानी तसेच वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून सतत पाऊस कोसळत पडत आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसाने जन जीवन विस्कळीत झाल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात