पुणे, 26 ऑगस्ट : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला (Ganeshotsav 2002) आता काही दिवसच उरले आहेत. राज्यभर सध्या गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी घरोघरी बाप्पा विराजमान होतील. त्याचबरोबर यंदा गणेश मंडळ कोणते देखावे सादर करणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा मोठ्या मिरवणुका आणि देखाव्याची प्रसिद्ध आहे.अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सोहळा येऊन ठेपला आहे. बाजारपेठ तसेच मूर्तिकार प्रत्येक जण हे बाप्पाच्या आगमनाची तयारीला लागला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पुण्याची ओळख असलेला सार्वजनिक गणेशोत्सवही यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देखाव्यांच्या कामालाही वेग आला आहे. प्रसिद्ध मूर्तीकार सतीश तारू विविध विषयांवरील देखाव्यांसाठी मूर्ती साकारण्यात व्यग्र आहेत. पुण्यातील कसबा पेठ येथे गेल्या 50 वर्षापासून देखाव्याचे व्यवसाय करणारे मूर्तिकार सतीश तारू यांच्याकडे यंदाच्या गणेशोत्सवात विविध विषयांवरील देखावा बनविण्याचे काम आले आहे.यंदाच्या वर्षी कोणते देखावे सादर केले जाणार या बाबतीत तारू यांनी माहिती सांगितली. ‘सध्या जगभरात तसेच देशात सुरू असलेल्या ज्वलंत विषय घेऊन गणेश मंडळे कडून गणेशोत्सवात देखाव्याची मागणी आहे. गणेश उत्सवात पर्यावरण, कोरोना योद्धा, गड किल्ल्यांचे संवर्धन तसेच यंदाच्या गणेश उत्सवात मागच्या दोन महिन्यात राज्यात जे सत्ता नाट्य घडले आहे त्यावर आधारित ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हा देखावे आहे. अशी माहिती यावेळी मूर्तिकार सतीश तारू यांनी दिली. जुनी मखर द्या नवीन घेऊन जा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांना खास ऑफर, पाहा VIDEO महागाईचा फटका गेली 2 वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. यावर्षी मात्र निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशभक्त आणि मंडळाप्रमाणेत मूर्तीकारांमध्ये उत्साह आहे. मात्र या उत्सवाला देखील महगाईता फटका बसला आहे. वाढत्या महागाईमुळे मंडळांकडंही फारसे पैसे नाहीत. त्यामुळे देखावाकारांना देखाव्याची किंमत देखील फारशी वाढवता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.