मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: जुनी मखर द्या नवीन घेऊन जा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांना खास ऑफर, पाहा VIDEO

Pune: जुनी मखर द्या नवीन घेऊन जा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांना खास ऑफर, पाहा VIDEO

X
पुण्यातील

पुण्यातील मखर विक्रेते अनिल कांबळे ( Anil Kamble ) यांनी जुनी मखर द्या नवीन मखर घेऊन जा असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

पुण्यातील मखर विक्रेते अनिल कांबळे ( Anil Kamble ) यांनी जुनी मखर द्या नवीन मखर घेऊन जा असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे 26 ऑगस्ट : कोरोना नंतर आता दोन वर्षानंतर सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. गौरी गणपतीचा ( gauri ganpati ) सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गौरी गणपतीच्या सजावटीच्या साहित्याने पुण्यामधील ( Pune ) बाजारपेठा सध्या सजल्या आहेत. विक्रेत्यांनी असंख्य प्रकारचे साहित्य घेऊन दुकाने सजवली आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मखर विक्रेते अनिल कांबळे ( Anil Kamble ) यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे.  

    दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पा आणि गौरीच्या सजावटीसाठी सुंदर मखर आवश्यक असतात. एका वर्षी वापरलेली मखर दुसऱ्या वर्षी सहसा वापरला जात नाही आणि अनेकदा ती टाकून दिली जाते. यावरती उपाय म्हणून मखर विक्रेते अनिल कांबळे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांच्याकडून घेतलेली मखर पुढच्या वर्षी त्यांना परत देऊन त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरी मखर घेऊ शकता असा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

    हेही वाचा : Pune: आले अपंगत्व तरी हरली नाही जिद्द! बाप्पाच्या आशीर्वादानं उभा केला संसार, VIDEO

    याबाबत अनिल यांनी सांगितले की, गेल्या 15 वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. तसेच 7 वर्षांपासून आम्ही एक उपक्रम सुरू केला. आम्ही मखर विकत असल्यामुळे आम्हाला अनेकदा असे जाणवले की लोकांच्याकडे असणाऱ्या मखर या अनेकदा लोक टाकून देतात. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. यावरती उपाय म्हणून आम्ही लोकांना आवाहन केले की त्यांनी आमच्याकडून घेतलेला जुना मखर एकदा वापरून झाल्यानंतर आम्हाला परत द्यावा आणि त्या मखरच्या बदल्यात त्यांना हवी ती दुसरी मखर त्यांनी घेऊन जावी. व त्या नवीन मखर वरती त्यांना 35 टक्के पर्यंत सूट देखील आम्ही देतो. यामुळे होते काय तर जुनी मखर आम्ही आमच्याकडे जमा केल्यानंतर त्या मखरची आम्ही डाकडूजी करतो. तिला पुन्हा व्यवस्थित करतो आणि ती नव्या स्वरूपामध्ये पुन्हा बाजारात आणली जाते. यामुळे एकच मखर अनेक वेळा वापरून होते आणि लोकांना देखील दर वेळेस नवनवीन मखर आपल्या गणपती बाप्पासाठी स्वस्तामध्ये चांगल्या पद्धतीची मिळते.

    वेगवेगळ्या प्रकारच्या मखर विक्रीसाठी उपलब्ध 

    आमच्याकडे एक फुटापासून ते तीन फुटापर्यंतच्या गणपतीच्या आणि गौरीसाठी मखर आहेत. या मखरीमध्ये धबधब्याची मखर, गोमुखाची मखर, मूषक मखर, त्रिशूल मखर दोन मजली मखर अशा विविध पद्धतीच्या मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत. सातशे रुपयांपासून ते 17 हजार रुपयापर्यंत मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत. रविवार पेठ येथील मनीष मार्केट शेजारी अग्रसेन भवन येथे सध्या आम्ही या मखर विक्रीस ठेवलेल्या आहेत, असे विक्रेते अनिल कांबळे यांनी सांगितले.

    पत्ता : मनीष मार्केट शेजारी अग्रसेन भवन, पुणे

    मोबाईल नंबर : 7020855224

    First published:

    Tags: Eco friendly, Ganesh chaturthi, Pune