मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : 2 वर्षानंतरचा उत्साह की समन्वयाचा अभाव? पुण्यातील विसर्जन मिरवणुका का लांबल्या?

Pune : 2 वर्षानंतरचा उत्साह की समन्वयाचा अभाव? पुण्यातील विसर्जन मिरवणुका का लांबल्या?

 यंदा गणेश विसर्जन मिरवणुका पुण्यामध्ये ( Pune ) दुसर्‍या दिवशीपर्यंत सुरु होत्या. यामुळे नागरिकांना या मिरवणुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

यंदा गणेश विसर्जन मिरवणुका पुण्यामध्ये ( Pune ) दुसर्‍या दिवशीपर्यंत सुरु होत्या. यामुळे नागरिकांना या मिरवणुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

यंदा गणेश विसर्जन मिरवणुका पुण्यामध्ये ( Pune ) दुसर्‍या दिवशीपर्यंत सुरु होत्या. यामुळे नागरिकांना या मिरवणुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 10 सप्टेंबर : कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामुळे गणेश भक्तामध्ये उत्साहाचे वातावरण पाहिला मिळाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरात गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन मिरवणुका उत्साहात निघालेल्या पाहिला मिळाल्या. अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi ) दिवशी गणेश विसर्जन व्हायला हवं होते मात्र यंदा गणेश विसर्जन मिरवणुका पुण्यामध्ये ( Pune ) दुसर्‍या दिवशीपर्यंत सुरु होत्या. यामुळे नागरिकांना या मिरवणुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

या विसर्जन मिरवणुकीला खूप प्रमाणात उशीर झाल्यामुळे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले की, तब्बल दोन वर्षानंतर गणेश विसर्जन मिरवणुका होत असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून नियमांबद्दल शिथिलता बाळगली गेली आणि याचाच गैरफायदा मंडळांनी घेतला. अनेक महत्त्वाच्या मंडळांनी आपल्या हेकेखोरपणामुळे सदर विसर्जन मिरवणुकीला उशीर झाला. खरं तर आपल्या संस्कृतीनुसार अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक संपन्न झाली पाहिजे. मात्र मंडळाच्या कडून मोठ्या प्रमाणामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेले. या गोष्टीची दखल घेऊन पुढील वर्षाच्या मिरवणुकीच्या नियोजनासाठी मंडळ आणि प्रशासनाने पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : पुणेकर यंदा विक्रम करणार? तब्बल 31 तासांनंतरही विसर्जन मिरवणुका सुरूच, पाहा Video

पुण्यात विसर्जन मिरवणुकांना विलंब का? 

मुळात राज्य सरकारकडून यावेळी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना केल्या गेल्या होत्या. तसेच राज्य सरकारने गणेश मंडळांवर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश मिळाल्याने पोलिसांकडून प्रारंभी बघ्याची भूमिका घेतली गेली. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही विचारणा झाली होती. मिरवणुकीतील पथक संख्यांवरही यावेळी कोणतीच बंधने नव्हती. परिणामी मानाच्या आणि नावाजलेल्या मंडळांनी 2 च्या जागी पाच-पाच पथकं लावली तिथंच मिरवणूक लांबली. मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंडळात तब्बल तासाभराचं अंतर पडलं.  तसेच मानाचे गणपती एका एका चौकामध्ये एक ते दोन तास पेक्षा अधिक वेळ वाजत गाजत होते.

यामुळे सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरुवात होऊन सुद्धा कसबा गणपतीचे विसर्जन संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास झाले. तर मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबाग गणपती दुपारी तीनच्या सुमारास मिरवणुकीमध्ये सामील झाला आणि तो मध्यरात्री दोन ते तीन च्या सुमारास विसर्जन झाले. मानाच्या पहिल्या पाच मंडळांची मिरवणूक तब्बल 9 तास लांबली. मिरवणूक लांबल्याने दगडूशेठला मिरवणुकीत सामिल व्हायला दुसरा दिवस उजाडला. मिरवणुकी दरम्यान प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला.

First published:

Tags: Pune