पुणे, 10 सप्टेंबर : आज सायंकाळपर्यंत पुण्यातील विसर्जन मिरवणूका सुरूच असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. तब्बल 31 तास झाले तरी अजूनही पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकर यंदा विक्रम करणार की, काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. काल पुण्यातही ( Pune) मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थरकणाऱ्या भक्तांच्या पावलाने एक वेगळाच उत्साह पुण्यात दिसत होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा मोठ्या संख्येने पुणेकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
पुणे : पोलिसांनी उत्साहात ढोल वाजवले. अगदी उपायुक्त, पोलिस शिपाई सोबतच ढोल पथकात pic.twitter.com/FLTzF4miCk
— News18Lokmat (@News18lokmat) September 10, 2022
याच पार्श्वभूमीवर मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सहभागी झाले. Pune: विसर्जन मिरवणुकीत कलाकारांचा जल्लोष, ढोलवादन करत दिला बाप्पाला निरोप VIDEO यामध्ये अभिनेता सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तर अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रृती मराठे, स्वप्नाली पाटिल, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे यांचा समावेश होता.
पुणेकर यंदा विक्रम करणार? तब्बल ३१ तासांनंतर अजूनही गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच #pune pic.twitter.com/KlvRtaaUO9
— News18Lokmat (@News18lokmat) September 10, 2022
दरम्यान 5.30 वाजता पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. थोड्याच वेळात अलका चौक या ठिकाणी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता हे गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.