Home /News /maharashtra /

Big Breaking: पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिरूरमध्ये न्यायालय परिसरात पत्नी आणि सासूवर जावयाचा गोळीबार

Big Breaking: पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिरूरमध्ये न्यायालय परिसरात पत्नी आणि सासूवर जावयाचा गोळीबार

गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं! शिरूरमध्ये न्यायालयाच्या परिसरात पत्नी आणि सासूवर जावयाचा गोळीबार

गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं! शिरूरमध्ये न्यायालयाच्या परिसरात पत्नी आणि सासूवर जावयाचा गोळीबार

Firing in Pune: पुण्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. माय-लेकींवर गोळीबार झाला आहे.

पुणे, 7 जून : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरूर (Shirur) येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार (Firing on mother and daughter) झाला आहे. भरदिवसा न्याायलयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. नेमकं काय आहे प्रकरण? कौटुंबिक वादातून जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे. त्यांचा न्यायालयात पोटगी साठीचा दावा सुरू होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी आई आणि मुलगी न्यायालयात आले होते. न्याायलयाच्या परिसरात थांबलेले असताना माजी सैनिक असलेल्या दीपक ढवळे याने स्वतः जवळच्या लायसन्स असलेल्या पिस्तूलमधून पत्नी आणि सूनेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा : माजी क्रिकेटरच्या वडिलांना अटक; बँक ऑफ महाराष्ट्रात सव्वा कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आरोपी अटकेत या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर आरोपी दीपक ढवळे याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी कारागृह अधीक्षकांच्या मुलाची हत्या गेल्या महिन्यात हडपसरमध्ये पती, पत्नी और वो या सिनेमा सारख्याच कथानकातून साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीने पोलीस अधीक्षकांच्या मुलाची हत्या केली आहे. आरोपी साक्षी हिने आपला पती आणि भावाच्या मदतीने अमरावतीला कारागृह पोलीस अधीक्षक असलेल्या गायकवाड यांच्या मुलाची हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर येथे चाकूने वार करून हत्या केली. पुण्यातील हडपसर येथे पती पत्नी और वो सिनेमातल्या कथानकाप्रमाने खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कथानकातल्या मुलीने म्हणजे साक्षी पांचाळ आणि तिच्या पतीने भावाच्या मदतीने घडवून आणला आहे. हडपसर पोलिसांनी साक्षी पांचाळ हिच्यासह तिचा पती आणि भाऊ यांच्यासह इतर तीन जणांना अटक केली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Gun firing, Pune

पुढील बातम्या