जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील धानोरीत तुफान राडा; अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यावर हल्ला, जेसीबीवरही दगडफेक, VIDEO

पुण्यातील धानोरीत तुफान राडा; अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यावर हल्ला, जेसीबीवरही दगडफेक, VIDEO

पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा, पालिका अधिकाऱ्यावरल हल्ला, जेसीबीवर दगडफेक, VIDEO

पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान राडा, पालिका अधिकाऱ्यावरल हल्ला, जेसीबीवर दगडफेक, VIDEO

Pune News: पुण्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर संतप्त नागरिकांनी हल्ला केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 29 मार्च : पुण्यात (Pune) अतिक्रमण हटविण्यासाठी (demolition of illegal encroachment) गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धानोरी परिसरात ही घटना घडली आहे. अतिक्रमण हटवण्यास विरोध करत संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर दगडफेक सुद्धा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यावर मनपा क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे अशा सर्वच ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातील धानोरी परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिम आज सकाळी सुरू करण्यात आली.

जाहिरात

या अतिक्रमणाला स्थानिकांनी विरोध केला. इतकेच नाही तर महानगरपालिका अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना मारहाण केली. तसेच कारवाईसाठी गेलेल्या जेसीबीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली. वाचा :  शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; शौचालयात धुतायेत थाळ्या, किळसवाणा VIDEO आला समोर संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी खरंतर पोलीस सुरक्षेसह ही कारवाई करायला हवी होती. अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली असून महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पालिकेकडून तात्पुर्ती ही कारवाई थांबवली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि महानगरपालिकेचे इतर अधिकारी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 30 ते 40 जणांच्या जमावाने ही मारहाण केली आहे. ही घटना खूपच गंभीर असून अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर काम कसे होणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आता महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करत आहेत. पण पोलीस आता या प्रकरणी काय कारवाई करतात हे पहावं लागेल. अधिकाऱ्यांना जमावाने केलेल्या मारहाणीची घटना तेथील काहींनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात