मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune Crime : भयानक! दारूचा ग्लास का सांडलास म्हणत केला मित्राचा खून, अन् मृतदेह कचऱ्यांच्या ढिगात फेकला

Pune Crime : भयानक! दारूचा ग्लास का सांडलास म्हणत केला मित्राचा खून, अन् मृतदेह कचऱ्यांच्या ढिगात फेकला

दोघे जण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. (Pune Crime) त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकला

दोघे जण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. (Pune Crime) त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकला

दोघे जण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. (Pune Crime) त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 05 ऑगस्ट : दोन मित्रांमध्ये कोणत्या कारणावरून भांडणे होतील याचा काहीच नेम नाही. यापूर्वी आपण मित्रांमध्ये मुलींच्या कारणासाठी भांडणे होऊन खून झाल्याची बातमी वाचली असेल. परंतु पुण्यात एक अजब प्रकार घडला आहे. दोघे जण एकत्र दारू पीत असताना एकाकडून दारूचा ग्लास सांडल्यामुळे त्याचा खून करण्यात आला. (Pune Crime) त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून तो कचरा महाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकल्याची घटना उघडकीस आली.

या प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासात समोर आले. तो पिंपरी चिंचवड परिसरात फिरस्ती होता.

हे ही वाचा : नामांकित बिल्डरला धमकी, मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत? छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला बेड्या

पोलिसांनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी माण- महाळुंगे रोडच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. आरोपी नीलेश व मृत हे एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून नीलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्यावरून नीलेशने काठीने मारहाण केली.

एकाच दिवशी दोन घटना

पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात एका तरुणाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला. महेश लक्ष्मण गुजर (वय 24, रा. गल्ली क्रमांक 26, शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शिवनेरीनगरमधील गल्ली क्रमांक 12 येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजर हा दुचाकीवरुन रस्त्याने जात होता. गुजर याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडणे झाली होती. कोंढव्यातील भगवा चौक परिसरात त्याला दोघांनी अडवले. त्यातील एकाने गुजर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात गुजर हा गंभीर जखमी झाला.

हे ही वाचा : पुण्याहून निघालेली ST बस सुसाट असताना चालकाला हार्टअटॅक; मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून 25 प्रवाशांना वाचवलं

रक्ताच्या थारोळ्यात तो पडल्याचे पाहिल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुजर याला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कोंढवा पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime news