पुणे, 8 ऑक्टोबर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी पुण्यातील मोतीबाग येथील संघ कार्यालयात पोहोचल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील कार्यालयाच्या प्रशासकांना आणि संघाच्या काही कार्यकर्त्यांना निवेदन दिले आहे.
मोहन भागवत आमच्याही आदरस्थानी आहेत. पण त्यांनी हे विधान का केलं याचं आम्हाला स्पष्टीकरण हवं आहे, अशा आशयाचे एक पत्र ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या पुण्यातील कार्यालयात दिलं आहे. त्यासोबत मोहन भागवत यांनी कळत नकळत हिंदू धर्मामध्येच द्वेष पसरवण्यासाचे काम केला असल्याचा आरोप देखील यावेळी आनंद दवे यांनी केला आहे.
'शिमग्यावर बोलणार नाही', फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक
काय म्हणाले मोहन भागवत?
आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) काल नागपूरमधील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, वर्ण आणि जाती व्यवस्था हा जुना विचार आहे. आता लोकांनी वर्ण आणि जातीव्यवस्था विसरायला हवी. ते पुढे म्हणाले की, सामाजिक भेदभावचं कारणं ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करावयास हवा. एनसीपी पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी भागवतांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं आहे. शुक्रवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भागवत म्हणाले होते की, वर्ण आणि जाती सारख्या गोष्टींचा त्याग करावयास हवा. कारण सद्यस्थितीत जाती व्यवस्थेचा कोणताही संबंध राहिलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Rss mohan bhagwat